Ayatollah Ali Khamenei (फोटो सौजन्य -X/@nypost)

Ayatollah Ali Khamenei Warning: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांनी अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. भविष्यात अमेरिकेच्या कोणत्याही हल्ल्याला इराण प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर झालेल्या हल्ल्यांना इराण योग्य उत्तर देईल, असा इशारा खामेनी यांनी दिला आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीनंतर खमेनी यांनी पहिल्यांदाच एका टेलिव्हिजन मुलाखतीत अमेरिकेला इशारा दिला.

तथापी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर इराणने पुन्हा अणुकार्यक्रम सुरू केला तर अमेरिका पुन्हा इराणच्या अणुतळांवर हल्ला करेल. यापूर्वी, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्रायल बघेई यांनी म्हटले आहे की, इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणच्या अणुतळांचे नुकसान झाले आहे, परंतु इराण आपला अणुकार्यक्रम सुरू ठेवेल. (हेही वाचा - India-Pakistan War: 'मी केवळ फोन कॉल्सद्वारे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवले'; नेदरलँड्समधील नाटो शिखर परिषदेत Donald Trump यांचा दावा (Video))

अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलवर विजय मिळवल्याची घोषणा केली आहे. तथापी, अमेरिकेने दोन्ही देशात युद्धबंदी घडवून आणण्याचं श्रेय घेतलं आहे. अमेरिकेने इराणमधील अणु तळांवर बॉम्बस्फोट आणि क्षेपणास्त्र हल्ले करून इस्रायलला त्याचे लक्ष्य साध्य करण्यास मदत केली. त्यानंतर, कतारच्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी आणण्यात आली. अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणचे अणु तळ उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे आता इराणने अणु शस्त्रे बनवण्याची इच्छा सोडून दिली आहे. (हेही वाचा - PM Netanyahu On Ceasefire: युद्धबंदीवर इस्रायलने सोडले मौन; पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले, 'इराणने युद्धबंदीचे उल्लंघन केले तर योग्य उत्तर दिलं जाईल')

इराणच्या अणुकार्यक्रमावर आक्षेप -

इराणच्या अणुकार्यक्रमाला अमेरिका आणि इस्त्रायल विरोध करत आहेत. अमेरिका कोणत्याही किंमतीत इराणला अणु शस्त्रे बनवू देणार नाही, कारण त्यामुळे इराण अधिक शक्तीशाली होईल. यामुळे अमेरिका आणि इतर देशांसाठी धोका निर्णाण होऊ शकतो. त्यामुळे अमेरिका इराणला विरोध करत आहेत.