PM Netanyahu On Ceasefire: युद्धबंदीवर इस्रायलने सोडले मौन; पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले, 'इराणने युद्धबंदीचे उल्लंघन केले तर योग्य उत्तर दिलं जाईल'

इस्रायली पीएमओने एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, 'इस्रायली सैन्याने त्यांचे सर्व लक्ष्य साध्य केले आहेत. इराणमध्ये केलेल्या लष्करी कारवाईची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने, आम्ही युद्धबंदीला सहमती देतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी सहमती दर्शवून आम्ही युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारतो.'

PM Netanyahu On Ceasefire: युद्धबंदीवर इस्रायलने सोडले मौन; पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले, 'इराणने युद्धबंदीचे उल्लंघन केले तर योग्य उत्तर दिलं जाईल'
Israel PM Benjamin Netanyahu (फोटो सौजन्य - फेसबुक)

PM Netanyahu On Ceasefire: इराण आणि इस्त्रायलमधील संघर्ष (Israel Iran Conflict) आज थांबला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दोन्ही देशातील युद्धबंदीची घोषणा केली आहे. तथापी, इराणसोबतच्या युद्धबंदीवर (Ceasefire) इस्रायलनेही मौन सोडले आहे. इस्रायलने युद्धबंदीला सहमती दर्शवली आहे. यासोबतच, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही इराणला संदेश दिला. इस्रायली पीएमओने एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, 'इस्रायली सैन्याने त्यांचे सर्व लक्ष्य साध्य केले आहेत. इराणमध्ये केलेल्या लष्करी कारवाईची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने, आम्ही युद्धबंदीला सहमती देतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी सहमती दर्शवून आम्ही युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारतो.'

दरम्यान, इस्रायलने असा इराणला युद्धबंदीचे उल्लघंन केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे. युद्धबंदीचे कोणतेही उल्लंघन केल्यास त्याला पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल, असं बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. तथापी, इस्रायली सरकारने एक निवेदन जारी केले आहे की, इस्रायली नागरिकांनी युद्धबंदीचे पूर्णपणे पालन होईपर्यंत आयडीएफ होम फ्रंट कमांडच्या सूचनांचे पालन करत राहावे. नेतन्याहू सरकारचे हृदय युद्धात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांसोबत आहे. युद्धात जखमी झालेल्यांच्या पूर्ण पुनर्प्राप्तीचीही आम्ही इच्छा करतो. (हेही वाचा - Ceasefire In Iran-Israel Conflict: इराण व इस्रायलमध्ये युद्धबंदी; Donald Trump यांनी केली घोषणा, 12 दिवसांचा संघर्ष संपला)

इस्रायल सरकारने मानले ट्रम्प यांचे आभार -

तथापी, ऑपरेशन रायझिंग लायन चालवून इस्रायलने ऐतिहासिक कामगिरी केली. गेल्या काही दिवसांत आयडीएफने इराणची राजधानी तेहरानमधील अणु तळांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका वरिष्ठ अणुशास्त्रज्ञासह 18 अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू झाला आहे. तथापी, इस्रायल सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल आणि इराणी अणु धोक्यावर मात करण्यास मदत केल्याबद्दल आभार मानले.  (हेही वाचा: Israel Attacked Iran's Nuclear Sites: अमेरिकेनंतर इस्रायलचा इराणच्या अणुस्थळांवर हल्ला)

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सोमवारी रात्री सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली, ज्यामध्ये संरक्षण मंत्री, आयडीएफ चीफ-ऑफ-स्टाफ आणि मोसादचे संचालक यांचा समावेश होता. बैठकीत असे वृत्त देण्यात आले की इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायनची सर्व उद्दिष्टे साध्य केली आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).