Israel Attacked Iran's Nuclear Sites: अमेरिकेनंतर इस्रायलचा इराणच्या अणुस्थळांवर हल्ला

अमेरिकेनंतर इस्रायलने इराणच्या फोर्डो अणु तळांवर हल्ला केला आहे. इराणच्या तस्निम वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, कोम प्रांतातील संकट व्यवस्थापन मुख्यालयाने म्हटले आहे की इस्रायली सैन्याने इराणच्या फोर्डो अणु तळांवर हल्ला केला आहे.

Israel Attacked Iran's Nuclear Sites: अमेरिकेनंतर इस्रायलचा इराणच्या अणुस्थळांवर हल्ला
Israel attacks Iran's nuclear sites |X@WarNews24x7

Israel Attacked Iran's Nuclear Sites: अमेरिकेने रविवारी इराणवर हल्ला केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत रशिया, चीन, पाकिस्तान आणि इतर देशांनी एक मसुदा ठराव सादर केला. त्यात पश्चिम आशियात तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीची मागणी करण्यात आली आहे. तथापी, अमेरिकेनंतर इस्रायलने इराणच्या फोर्डो अणु तळांवर हल्ला केला आहे. इराणच्या तस्निम वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, कोम प्रांतातील संकट व्यवस्थापन मुख्यालयाने म्हटले आहे की इस्रायली सैन्याने इराणच्या फोर्डो अणु तळांवर हल्ला केला आहे.

इराणमधील 6 विमानतळांवर बॉम्बहल्ला

दरम्यान, इस्रायलने दावा केला आहे की त्यांनी इराणच्या 6 हवाई तळांवर हल्ला केला आहे. आयडीएफने मध्य, पूर्व आणि पश्चिम इराणमधील 6 विमानतळांवर बॉम्बहल्ला केला आहे. आयडीएफने म्हटले आहे की त्यांनी ड्रोन हल्ल्यात 15 इराणी लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर नष्ट केले आहेत. इस्रायली सैन्य सतत इराणवर बॉम्बहल्ला करत आहे. इस्रायली सैन्याने इस्रायली सैन्याने इराणची राजधानी तेहरान आणि कारजला लक्ष्य केल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा - Israel Strikes Military Airports In Iran: इस्रायलचा इराणमधील 6 लष्करी विमानतळांवर हल्ला; 15 विमाने आणि हेलिकॉप्टर नष्ट)

इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित -

इराणने आज इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची मालिका डागली. ताज्या हल्ल्यात, इस्रायलच्या दक्षिणेकडील भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. इराणने इस्रायल इलेक्ट्रिक कॉर्पोरेशनवर हल्ला केला. त्यामुळे अनेक शहरांमध्ये वीज खंडित झाली आहे. इराणी हल्ल्यादरम्यान, सुमारे 35 मिनिटे संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजत होते. (हेही वाचा - Operation Midnight Hammer: ट्रम्प यांचा दावा – इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर भीषण हल्ला, सत्ताबदलाचा इशारा?)

इराणने इस्रायलमध्ये डागले क्षेपणास्त्र - 

इराणमध्ये आतापर्यंत 950 लोकांचा मृत्यू -

इराण-इस्रायल युद्धात आतापर्यंत 950 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टनस्थित मानवाधिकार गटांच्या मते, इस्रायली हल्ल्यात 950 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 3450 हून अधिक जखमी झाले आहेत. इस्रायलने म्हटले आहे की युद्धात आतापर्यंत 24 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 1000 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).