इंडोनेशिया सुनामी : मृतांची संख्या 800 हून अधिक तर हजारो जखमी
डोनेशियातील भूकंप (Photo Credits: IANS)

जकार्ता : इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर भुकंपाचा जबर धक्का बसल्यानंतर सुनामीचा जोरदार फटका बसला. भुकंपाची तीव्रता सुमारे 7.5 रिश्टर स्केल इतकी होती. या नैसर्गिक आपत्तीत बळी गेलेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. बळींचा आकडा आता 800 हून अधिक झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इंडोनेशिया सुनामी : भूकंपाच्या तडाख्यात 384 जणांचा मृत्यू

7.5 रिश्टर स्केलच्या भुकंपानंतर समुद्रात मोठमोठ्या लाटांनी थैमान घातले.

अचानक आलेल्या या आपत्तीमुळे लोक घाबरुन सैरावैरा पळू लागले. लोकांचा जीव वाचवण्याची धडपड यात पाहायला मिळते.