इंडोनेशियाचे माजी राष्ट्रपती सुकर्णो (Sukarno) यांची मुलगी सुकमावती सुकर्णोपुत्री (Sukmawati Soekarnoputri) यांनी इस्लाम धर्माऐवजी हिंदूत प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. 26 ऑक्टोंबरला त्या एका पूजेत सहभागी होणार असून तेव्हाच हिंदू धर्म स्विकारणार आहेत. सीएनएन इंडोनेशियाच्या रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी सुकर्णो हेरिटेज एरिया मध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सुकमावती या माजी राष्ट्रपती सुकर्णो यांची तिसरी मुलगी आहे. माजी राष्ट्रपती मेगावती सुकर्णोपुत्री यांची लहान बहिण आहे. 70 वर्षीय सुकमावती सुकर्णोपुत्री इंडोनेशिया मध्ये राहतात. 2018 मध्ये, कट्टरपंथी इस्लामिक गटांनी त्यांच्याविरोधात ईशनिंदाची तक्रार दाखल केली होती.
खरंतर सुकमावती यांनी एक कविता शेअर केली होती ज्यामुळे कट्टरपंथियांनी आरोप केला होता की, त्यांनी इस्लाम धर्मचा अपमान केला आहे. या घटनेनंतर सुकमावती यांनी आपल्या कवितेसाठी माफी सुद्धा मागितली होती. त्यानंतर वाद संपल्याचे ही दिसून येत नाही आहे. त्याच्यावर अनेकदा टीकाही झाली आहे.(China: मुलांच्या गैरवर्तवणूकीची शिक्षा मिळणार पालकांना, चीनमध्ये बनवला जात आहे नवा कायदा)
इंडोनेशियामध्ये इस्लामियांच्या अनुयायांची संख्या अधिक आहे. ऐवढेच नव्हे तर इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. सुकमावतीचे वडील सुकर्णो यांच्या वेळी भारत आणि इंडोनेशियाचे संबंध अधिक उत्तम होते.
सुकमावती हिचे वकील विटारियोने रेजसोप्रोजो यांनी म्हटले की, याचे कारण तिची आजी आहे. त्यांनी असे ही म्हटले की, सुकमावती यांनी या संदर्भात खुप अभ्यास सुद्धा केला आहे. हिंदू धर्मशास्र उत्तम प्रकारचे वाचले आहे. बालीच्या प्रवासावेळी सुकमावती बहुतांश करुन हिंदू धर्माच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असे. हिंदू धर्माच्या लोकांसोबत बातचीत करत असे. सुकमावती या हिंदू धर्म स्विकारणार असल्याने यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे.