Indian Embassy Issues Advisory: भारतीयांना दुबईचा अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला; UAE मधील भारतीय दूतावासाने जारी केली अॅडव्हाजरी
Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

Indian Embassy Issues Advisory: भारतीय दूतावासाने (Indian Embassy) आपल्या नागरिकांना संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देणारी अॅडव्हाजरी (Advisory) जारी केली आहे. दूतावासाने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Dubai International Airport) प्रवास करणाऱ्या भारतीयांना या आठवड्यात अतिवृष्टीनंतर ऑपरेशन्स सामान्य होईपर्यंत अनावश्यक प्रवासाचे वेळापत्रक पुन्हा शेड्यूल करण्याचा सल्ला दिला आहे.

यूएईमध्ये मुसळधार पाऊस -

या आठवड्यात यूएईमध्ये जोरदार पाऊस झाला. यूएई या सर्व परिस्थितीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मुसळधार पावसामुळे दुबई आणि परिसरात पूर आला आहे. येथील परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. दूतावासाने सांगितले की, यूएईचे अधिकारी परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत. उड्डाणांच्या प्रस्थानाची तारीख आणि वेळेबाबत संबंधित एअरलाइन्सकडून पुष्टी माहिती मिळाल्यानंतरच प्रवाशांना विमानतळावरून प्रवास करता येईल, असा सल्ला विमानतळ अधिकाऱ्यांनी दिला आहे. (हेही वाचा - Viral Video: पूराच्या पाण्यासोबत वाहणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ)

भारतीय दूतावासाने जारी केला सल्लागार -

सल्लागारात म्हटले आहे की, UAE मधील प्रतिकूल हवामानामुळे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील फ्लाइट्सची संख्या तात्पुरती मर्यादित करण्यात आली आहे. दुबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांना ऑपरेशन्स सामान्य होईपर्यंत अनावश्यक प्रवास पुन्हा शेड्यूल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे दूतावासाने सल्लागारात म्हटले आहे. भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी, दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने 17 एप्रिलपासून आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. (हेही वाचा - Viral Video: पूराच्या पाण्यासोबत वाहणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ)

जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या दुबई विमानतळावरून उड्डाणे अद्याप सामान्य झाली नाहीत. येथे येणाऱ्या विमानांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. दुबई विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना त्यांची विमानसेवा निश्चित होईपर्यंत येथे न येण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, नजीकच्या अबुधाबी विमानतळावरून विमानसेवा सामान्य झाली आहे.

एअर इंडियाची दुबईला जाणारी उड्डाणे रद्द -

मुसळधार पावसामुळे एअर इंडियाने रविवारपर्यंत दुबईला जाणारी आपली उड्डाणे रद्द केली आहेत. एअरलाइनने शुक्रवारी सांगितले की, ज्या ग्राहकांनी 21 एप्रिलपर्यंत प्रवासासाठी फ्लाइट बुक केली आहेत त्यांना पुन्हा सवलत आणि तिकीट रद्द केल्यावर पूर्ण परतावा दिला जाईल.