UAE मधील 900 कैद्यांच्या सुटकेसाठी भारतीय उद्योगपतीकडून 2.5 कोटी रुपयांची देणगी, वाचा सविस्तर
Firoz Merchant | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

UAE Prisoners Release: संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील 900 कैद्यांची सुटका करण्यासाठी भारतीय उद्योजक फिरोज मर्चंट (Firoz Merchant) यांनी 1 दशलक्ष दिरहम (अंदाजे 2.5 कोटी रुपये) दान केले आहेत. यूएईमध्ये अनेक भारतीय कैदेत आहेत. त्यातील किमान 900 कैद्यांची सुटका व्हावी यासाठी या उद्योजकाने पुढाकार गेतला आहे. या कैद्यांचे स्वातंत्र्य सुरक्षीत करणे आणि सन 2024 अखेरीस 3,000 कैद्यांची मुक्तता करणे हे त्यांचे उद्दीष्ठ आहे. दुबईस्थित प्युअर गोल्ड ज्वेलर्सचे मालक, 66 वर्षीय फिरोज मर्चंट यांनी रमझानपूर्वी नम्रता, माणुसकी, क्षमा आणि दयाळूपणाचा भाव म्हणून UAE अधिकाऱ्यांकडे महत्त्वपूर्ण योगदान दिले, असे त्यांच्या कार्यालयातील निवेदनात म्हटले आहे.

मर्चंटच्या परोपकारी प्रयत्नांमुळे, विशेषत: त्याच्या 'द फॉरगॉटन सोसायटी' उपक्रमाद्वारे, 900 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. यूएई कैद्यांना त्यांच्या उदारतेचा फायदा झाला आहे. या उपक्रमामध्ये अजमानमधील 495, फुजैराहमधील 170, दुबईतील 121, उम्म अल क्वाइनमधील 69 आणि रास अल खैमाह येथून 28 कैद्यांची सुटका करण्यात आली, असे मॅगल्फ न्यूज पोर्टलने वृत्त दिले आहे. कैद्यांची सुटका करून घेण्यासोबतच, मर्चंटने त्यांची कर्जेही फेडली आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी विमानभाडे उपलब्ध करून दिले. ज्यामुळे या कैद्यांनी जीवनाची नवीन सुरुवात केली. मर्चंट यांचे सन 2024 साठीचे मुख्य उद्दिष्ट आहे की, 3,000 हून अधिक कैद्यांना मदत करणे हे आणि कुटुंबांना पुन्हा एकत्र करणे व सलोखा वाढवणे हे आहे. (हेही वाचा, Indian Men Imprisoned in UAE Return: दुबईमध्ये तुरुंगवास, तेलंगणातील 5 जणांची 18 वर्षांनंतर सुटका, कुटुंबीयांशी भेटीचा Heart Touching Video)

प्राप्त माहितीनुसार, यूएईमधील मध्यवर्ती कारागृहातील पोलिस महासंचालकांसोबत मर्चंटच्या सहकार्याने 20,000 हून अधिक कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. ज्यामुळे सरकारी अधिकारी आणि कैद्यांकडून त्यांची प्रशंसा झाली आहे. सरकारच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, मर्चंट यांनी सांगितले की, मानवतेला कोणतीही सीमा नसते. कर्नल मोहम्मद युसूफ अल-मातरोशी, एक UAE अधिकारी, यांनी कैद्यांच्या पुनर्वसनासाठी मर्चंटच्या वचनबद्धतेचे कौतुक केले, अनेक व्यक्तींवरील दंडाचे ओझे कमी करण्यात आणि उज्वल भविष्यासाठी देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले. (हेही वाचा, कतारमधील नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी Shah Rukh Khan याचा हात, PM मोदी यांनी काहीच नाही केले, Subramanian Swamy यांचा दावा)

अलिकडेच दुबई येथे जवळपास दोन दशकांपासून तुरुंगात खितपत पडलेल्या कामगारांची सुटका झाली. बीआरएस नेते केटी रामाराव यांच्या अथक प्रयत्नांमुळेया सर्वांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला. हे कामगारही जवळपास 18 वर्षांनंतर मायदेशी परतले. आपले कुटुंबीय आणि नातेवाईकांशी त्यांची भेट झाली.