पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे वादात अडकले आहेत. पाकिस्तानमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. परंतु, इम्रान खान यांनी बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत असे विधान केले आहे की, ज्यामुळे जगभरातून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. पाकिस्तानमध्ये लैंगिक छळाच्या वाढत्या घटनांना महिलांचे कपडे कारण असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओवर जगभरातून कमेंट केली जात आहे. इमरान खान यांनी यापूर्वी देखील असे विधान केले होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 'एक्सियोस ऑन एचबीओ'ला (Axios on HBO) दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, 'जर स्त्रिया कमी कपडे घालतात, ज्यामुळे पुरुषांवर त्यांचा परिणाम होतो. पुरूष रॉबट असते तर कदाचीत असे घडले नसते. ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- बाबो! चक्क नर उंदरांना Pregnant करून त्यांना पिल्लांना जन्म देण्यास भाग पाडले; China च्या शास्त्रज्ञांचा विचित्र प्रयोग
व्हिडिओ-
"If a woman is wearing very few clothes, it will have an impact on the men, unless they're robots" says PM Imran khan. #PMImranKhan @jonathanvswan pic.twitter.com/IAfZfoQQnQ
— Raza Zaidi (@Razaazaidi) June 21, 2021
आंतरराष्ट्रीय न्यायालयातील दक्षिण आशियाच्या कायदेशीर सल्लागार रीमा उमर यांनी ट्विट केले की, "पंतप्रधान इमरान खान यांनी पाकिस्तानमधील लैंगिक अत्याचाराच्या कारणांबद्दल केलेले विधान अत्यंत निराशाजनक आहे ज्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा पीडिताला दोषी ठरवले आहे. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.
पाकिस्तानने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात दर 24 तासांत 11 बलात्काराच्या समोर येत आहेत. तथापि, आरोपींना शिक्षा देण्याचे प्रमाण केवळ 0.3 टक्के आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे, देशातील बलात्काराचे कायदे कमकुवत असल्याचे बोलले जात आहे.