बाबो! चक्क नर उंदरांना Pregnant करून त्यांना पिल्लांना जन्म देण्यास भाग पाडले; China च्या शास्त्रज्ञांचा विचित्र प्रयोग
Rat (Photo Credits: Pixabay)

चीन (China) हा एक असा देश आहे जिथे मोठ्या प्रमाणावर विचित्र संशोधन होत असते. अलीकडेच चीनच्या वुहान लॅबमधून बाहेर पडलेल्या एका वैज्ञानिकानेही असाच दावा केला होता. चीनमध्ये जे संशोधन घडत असते, त्यावर सामान्यत: इतर देशांमध्ये बंदी असते. आता चिनी शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की कदाचित पुरुषही प्रेग्नेंट (Pregnant) होऊ शकतात. यासाठी चीनी शास्त्रज्ञ बर्‍याच वर्षांपासून संशोधन करत होते व आता त्यांच्या एका प्रयोगाला यश आले आहे. चीनमधील वैज्ञानिकांनी केलेल्या या संशोधनात नर उंदीरांच्या शरीरावर प्रयोग करण्यात आले.

यात शस्त्रक्रियेद्वारे मादी उंदराच्या शरीरातून काढलेले गर्भाशय पुरुषाच्या शरीरात घातले गेले. यानंतर, नर उंदीर प्रेग्नेंट झाल्यानंतर सिझेरियनच्या माध्यमातून मुलांना जन्माला आणले गेले. या संशोधनानंतर आता भविष्यात पुरुषही प्रेग्नेंट होण्याची शक्यता वाढली आहे. इन्फोव्हर्सच्या अहवालानुसार या संशोधनानंतर आता ज्या ट्रान्सजेंडर्सना मुले हवी आहेत त्यांना मदत मिळू शकेल.

चीनच्या शास्त्रज्ञांनी फ्रँकन्स्टाईन-स्टाईल प्रयोगांद्वारे नर उंदीरांना जन्म देण्यास भाग पाडले आहे. शांघायमधील नेवल मेडिकल युनिव्हर्सिटीच्या (Naval Medical University) या पथकाने चार स्टेप्समध्ये पुरुष गरोदरपणाचे उंदीर मॉडेल तयार केले. पहिल्या स्टेपमध्ये पुरुष व मादी उंदरांना त्यांच्या त्वचेद्वारे एकमेकांशी जोडले गेले. त्यानंतर पुरुषामध्ये गर्भाशयाचे रोपण केले गेले. नंतर नर आणि मादी दोन्ही उंदीरांमध्ये भ्रूण रोपण केले गेले. सिझेरियन करण्यापूर्वी 21.5 दिवस गर्भ विकसित करण्यासाठी ठेवला होता. (हेही वाचा: धक्कादायक! पतीची हत्या करून त्याचे Penis सोयाबीन तेलात शिजवले; 33 वर्षीय पत्नीला अटक)

'उंदीरांना जन्म दिल्यानंतर, पथकाने उंदरांवर ‘विभक्त शस्त्रक्रिया’ केली. त्यांना आढळले की ऑपरेशननंतर तीन महिन्यांपर्यंत सर्व नर प्राणी जिवंत राहू शकतात. संशोधकांनी सांगितले की, या प्रयोगातून जन्माला आलेल्या उंदरांना आरोग्याच्या कोणत्याही समस्या उद्भवल्या नाहीत. त्यांचे हृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड, मेंदू, अंडकोष, गर्भाशयात विकृती नव्हती. सध्या तरी याचा सक्सेस रेट फक्त 3.68 टक्के असल्याचे सांगितले आहे. मात्र पुरुष उंदरांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे ज्याद्वारे 10 मुलांना जन्म दिला गेला.