धक्कादायक! पतीची हत्या करून त्याचे Penis सोयाबीन तेलात शिजवले; 33 वर्षीय पत्नीला अटक
पतीचे लिंग तेलात शिजवले (संग्रहित संपादित प्रतिमा)

ब्राझीलमध्ये (Brazil) एका महिलेला पतीच्या हत्येसाठी अटक करण्यात आली असून, तिच्यावर आरोप आहे की तिने पतीची हत्या केल्यानंतर त्याचे जननेंद्रिय (Penis) कापून ते शिजवले. ब्राझीलमधील साओ गोन्कालो येथे रिओ दि जानेरो येथून गुआनाबारा खाडीच्या पलिकडे 7 जून रोजी Dayane Cristina Rodrigues Machado या 33 वर्षीय महिलेस पोलिसांनी अटक केली. आरोपी महिलेच्या शेजार्‍यांनी या घटनेबाबत पोलिसांना कळवले. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा, पीडितेचा निर्जीव, नग्न आणि विकृत अवस्थेतील मृतदेह सापडला.

या व्यक्तीची ओळख आड्रे अशी केली गेली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीने त्याचे लिंग कापले आणि ते फ्राईंग पॅनमध्ये सोयाबीन तेलात शिजवले. अहवालानुसार या दाम्पत्यामध्ये वेगळे होण्याबाबत मतभेद झाल्यानंतर साधारण पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा घडल्याचा पोलिसांचा विश्वास आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून स्वयंपाकघरातील चाकू जप्त केला असून, तोच तिने आपल्या पतीची हत्या करण्यासाठी वापरला असावा असा पोलिसांना संशय आहे. अटक करण्यात आलेल्या मचाडोवर खुनाचा आणि मृतदेहाचा अपमान केल्याचा आरोप आहे.

वृत्तानुसार, हे जोडपे 10 वर्ष एकत्र होते आणि दोन वर्षांपूर्वी ते विभक्त झाले होते. मात्र तरीही ते एकमेकांना भेटत असे. त्यांना एक आठ वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी आहे. हे एकत्र पिझ्झेरिया चालवतात. गुन्ह्याच्या वेळी मुले तिथे हजर होती का नाही, हे समजू शकले नाही. न्यूज साइट यूओएलनुसार, ज्या दिवशी हा गुन्हा घडला तेव्हा हे दोघेही बाहेर एका बार मध्ये गेले होते. मचाडोच्या वकिलांनी सांगितले की, आड्रेने तिला धमकावले व तिने स्वत: चा बचाव करण्यासाठी त्याला ठार मारले. आंद्रेच्या बहिणीने सांगितले की, आंद्रेने मचाडोची फसवणूक केल्याने तिने त्याची हत्या केली. (हेही वाचा: 'No Decuplets': 10 मुलांना जन्म दिल्याचा दावा करणारी Gosiame Thamara Sithole गायब; बॉयफ्रेंडने जारी केले निवेदन- 'कोणताही पुरावा नाही')

वकिलाने पुढे सांगितले की, आड्रेने नात्याचा शेवट स्वीकार केला नाही. त्याने मचाडोला धमकावले की, ती जर त्याच्यासोबत राह्त नसेल इतर कोनासोबतही राहू शकत नाही. याबाबत अधिक तपास सुरु आहे.