Sharia Law in Afghanistan: महिलांनी व्यभिचार केल्यास त्यांना दगडाने ठेचून ठार मारले जाईल; तालिबान नेता अखुंदजादाची घोषणा
Afghan women (फोटो सौजन्य - X/@DaveAtherton20)

Islamic Sharia Law: महिलांनी व्यभिचार (Adultery) केल्यास त्यांना दगडाने ठेचून ठार मारले जाईल, अशी घोषणा तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा (Mullah Hibatullah Akhundzada) याने एका नवीन ऑडिओ संदेशात केली आहे. अफगाण महिलांना (Afghan Womens) 'व्यभिचार सारख्या गुन्ह्यांसाठी' सार्वजनिकपणे शिक्षा दिली जाईल, असंही त्याने म्हटलं आहे. तालिबान (Taliban) च्या राष्ट्रीय प्रसारकाने हा ऑडिओ जारी केला असून, त्यात शरिया कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाईल, असंही जाहीर करण्यात आलं आहे.

हिबतुल्ला अखुंदजादाने आपल्या घोषणेत म्हटलं आहे की, 'जेव्हा आम्ही महिलांना दगड मारतो, तेव्हा तुम्ही म्हणता ते महिलांच्या हक्कांचे उल्लंघन आहे. पण आम्ही लवकरच व्यभिचारासाठी शिक्षेची अंमलबजावणी करू. आम्ही महिलांना जाहीर फटके मारू. आम्ही त्यांना जाहीरपणे दगड मारून ठार मारू. हे सर्व तुमच्या लोकशाहीच्या विरोधात आहेत पण आम्ही ते करत राहू. आम्ही दोघे म्हणतो की आम्ही मानवी हक्कांचे रक्षण करतो, परंतु आम्ही ते देवाचे प्रतिनिधी म्हणून करतो आणि तुम्ही ते सैतानाचे प्रतिनिधी म्हणून करता. (वाचा - Afghanistan: तालिबानने पुन्हा जारी केला नवा फर्मान! महिलांना पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेता येणार नाहीत)

पाश्चिमात्य लोक ज्या हक्कांबद्दल बोलत आहेत, ते अधिकार स्त्रियांना हवे आहेत का? ते शरिया आणि मौलवींच्या मतांच्या विरोधात आहेत, ज्या मौलवींनी पाश्चिमात्य लोकशाहीचा पाडाव केला. मी मुजाहिदीनला सांगितले की आम्ही पाश्चिमात्य लोकांना सांगतो की आम्ही तुमच्या विरुद्ध 20 वर्षे लढलो. (वाचा - Taliban Bans Beauty Salons in Afghanistan: ब्यूटी सलून, पार्क-जिमला जाण्यास बंदी, सार्वजनिक ठिकाणी महिलांना चेहरा झाकण्याचे आदेश; जाणून घ्या तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर घातल्या गेलेल्या निर्बंधांची यादी)

आम्ही आणखी 20 वर्षे तुमच्याविरुद्ध लढू. आम्ही या भूमीवर शरिया आणू. आम्ही आता शरिया कृतीत आणू. खुंदजादा यांच्या मते, आंतरराष्ट्रीय समुदाय ज्या प्रकारे महिलांच्या हक्कांबद्दल बोलतो, ते तालिबानच्या इस्लामिक शरियाच्या विरोधात आहे.