Afghanistan: तालिबानने पुन्हा जारी केला नवा फर्मान! महिलांना पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेता येणार नाहीत
Representative Image (Credits: Wikimedia Commons)

Afghanistan: अफगाणिस्तान (Afghanistan) ची सत्ता बळकावल्यानंतर तालिबानचे राज्यकर्ते तेथील महिलांसाठी रोज नवनवीन फर्मान काढत आहेत. अलीकडेच त्यांनी एक फर्मान जारी केले की, तालिबानी महिलांना त्यांचे उपचार पुरुष डॉक्टरांकडून करून घेता येणार नाहीत. त्यांच्या या निर्णयानंतर अफगाणिस्तानातील मोडकळीस आलेल्या वैद्यकीय सुविधांना आणखी फटका बसणार आहे. त्याच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानातील मुली आणि महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढेल, असे मत जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

वृत्तानुसार, तालिबानच्या या निर्णयामुळे तेथील वैद्यकशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला असून या निर्णयामुळे काबूलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना घरी बसावे लागले आहे. अफगाणिस्तानच्या महिला डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी जगाला त्यांच्या दुर्दशेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. कारण देशातील तालिबान शासक महिलांच्या स्वातंत्र्यावर त्यांचे आक्रमण सुरू ठेवत आहेत. तालिबान्यांच्या नव्या फर्मानानुसार आता पुरुष डॉक्टरांकडून महिला रुग्णांना उपचार घेता येणार नाहीत. तालिबान्यांच्या या फर्मानामुळे देशातील महिला वैद्यकीय व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा - WHO कडून Noida स्थित Marion Biotech निर्मित दोन कफ सिरप वापरण्यास Uzbekistan मध्ये बंदी)

वीओनने काबूलमध्ये राहणाऱ्या डॉक्टरांना फोनवर विचारले की तिला उर्वरित जगाकडून काय अपेक्षा आहेत? यावर डॉक्टरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मला जगातील देशांना सांगायचे आहे की, आम्हाला मदत करा. आम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडायचे आहे.

दरम्यान, ऑगस्ट 2021 मध्ये सत्ता मिळाल्यानंतर अफगाणिस्तानने तेथील महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमध्ये महिला पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेऊ शकणार नाहीत, पुरुषाशिवाय महिलांना घराबाहेर पडता येणार नाही, महिलांना शॉपिंग मॉल्समध्ये काम काम करण्यास बंदी. तसेच महिला आणि मुलींना अभ्यास करण्यापासून रोखण्यात आले असून आता त्यांच्या खेळांवरही बंदी घालण्यात आली आहे.

महिलांच्या शिक्षणावर बंदी घालण्याच्या प्रश्नावर तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले की, आम्ही महिलांच्या शिक्षणावर बंदी घातली नाही, ती काही काळासाठी पुढे ढकलली आहे.