Google Doodle : कर्णबधीरांचे पितामह Charles-Michel de l'Épée यांना गुगलची आदरांजली
Charles-Michel de l'Épée यांना गुगलची आदरांजली (Photo credit : YouTube)

Google Doodle : सांकेतिक वर्णमालेचे जनक चार्ल्स् मिशेल यांच्या 306 व्या जयंतीनिमित्त, गुगलने त्यांना आपल्या गुगल डूडलच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. 24 नोव्हेंबर 1712 साली फ्रांस येथील वर्सेस या शहरात चार्ल्स् मिशेल डुलिपी यांचा जन्म झाला होता. यांनी आपले संपूर्ण जीवन कर्णबधीर लोकांना समर्पित केले होते. कर्णबधीर लोकांसाठी जगातील पहिली शाळा चार्ल्स् यांनीच सुरु केली होती. म्हणून चार्ल्स् यांना कर्णबधीर लोकांचे पितामह म्हणूनही ओळखले जातात. याचीच आठवण म्हणून गुगलने त्यांना अभिवादन केले आहे.

गुगलने तयार केलेल्या या गुगल डूडलमध्ये 6 लहान मुले एकमेकांशी खाणखुणांनी बोलत असल्याचे दिसत आहे. या चित्रांखाली कर्णबधिर लोक वापरत असलेल्या खाणाखुणाही दाखवण्यात आल्या आहेत.

चार्ल्स् मिशेल डुलिपी यांचा जन्म एका संपन्न घरात झाला होता. एकदा रस्त्यावर दोन बहिणी एकमेकींशी हातवारे करून बोलत असल्याचे यांनी पहिले, आणि त्यानंतरच चार्ल्स् यांनी कर्णबधीरांना शिकवण्याचा निर्णय घेतला. आपले संपूर्ण जीवन त्यांना अशा कर्णबधीर मुलांसाठी काम केले. फ्रेंच सरकारनेदेखील त्यांच्या कामाची दखल घेतली होती. आज फ्रांसमध्ये लोकांचे मुलभूत हक्क आणि अधिकार यांमध्ये अशा कर्णबधीर लोकांसाठी काही वेगळे हक्क राखून ठेवले आहेत. 23 डिसेंबर 1789 रोजी वयाच्या 77व्या वर्षी पॅरिस येथे चार्ल्स् मिशेल डुलिपी यांचे निधन झाले.