Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळात जपानने (Japan) विकसित केलेले Avifavir औषध पुढील आठवड्यात रशिया (Russia) तर्फे कोरोनाच्या रुग्णांवर वापरले जाणार आहे. या कोरोनाच्या लढ्यात हे औषध गेम चेंजर म्हणून काम करेल असा दावा करण्यात येत आहे, त्यामुळे जर का खरोखरच या औषधाचा सकारत्मक परिणाम झाला तर या संकटातून मुक्त होण्यास जगाला मोठी मदत होउ शकते. Avifavir हे औषध 11 जून पासून रुग्णांवर वापरण्यात येणार आहे. सुरुवातीला रशियातील तब्बल 60 हजार रुग्णांवर याचा प्रयोग होईल. सध्याच्या माहितीनुसार हे औषध अवघ्या दहा दिवसात कोरोना संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील विषाणूंवर परिणाम दाखवू शकते असे सांगितले जातेय. विषाणूची शक्ती कमी करून त्याला पसरण्यापासून रोखण्यात हे औषध काम करेल असा दावा करण्यात येत आहे. यापूर्वी टोकियो Tokiyo) मध्ये, हे औषध इन्फ्लूएन्झा आणि आरएनए विषाणूंविरूद्ध लढ्यात गेम-चेंजर असल्याचे सिद्ध झाले होते. Cannabis & Coronavirus: कोरोना व्हायरस रोखण्यासाठी गांजाचा उपयोग केला जाऊ शकतो: अभ्यासातून खुलासा

रशियाच्या आरडीआयएफ प्रमुख किरील दिमित्रीव्ह यांनी सांगितल्यानुसार, या औषधांसाठी उत्पादक ChemRar यांना 50 टक्के रक्कम देऊ केली आहे. यासाठी जपानचे मूळ संशोधन असल्याने किंमत कमी केली आहे, मात्र तरीही या मागे एकूण 300 मिलियन खर्च झाला आहे. जपान मध्ये पंतप्रधान शिन्झो आबे यांनी कोव्हीड 19 औषध फेव्पीपीरवीर विकसित करण्यासाठी $128 दशलक्ष डॉलर्स सरकारी निधी उपलब्ध करून देण्यात आली होती. पण अद्यापपर्यंत त्यांना यश मिळू शकलेले नाही. Moderna Coronavirus Vaccine: अमेरिकेमध्ये मानवी चाचणीचे सुरूवातीच्या टप्प्यातील निष्कर्ष दिलासादायक असल्याचा कंपनीचा दावा.  

दिमित्रीव्ह यांनी पुढे सांगितले की, या औषधाचा आजवर झालेल्या वापरात कोणताही वाईट परिणाम दिसून आलेला नाही. उलट क्लिनिकल चाचण्यांमध्ये औषधाचे फार चांगले परिणाम दिसून आले. चार दिवसानंतर 65 टक्के रुग्णांना विषाणूचा संसर्ग झाला नाही". मध्य-पूर्व आणि लॅटिन अमेरिकेतील काही देश मॉस्कोमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाल्यानंतर औषधे आयात करण्यासाठी तयार आहेत.

दरम्यान, कोरोना व्हायरस च्या 4,14,000 रुग्णांसह रशिया सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकावरील कोरोना बाधित देश ठरला आहे. मात्र संख्या जास्त असूनही, तुलनेने कमी मृत्यू (आजवर 4,855) असल्याने अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. हे औषध प्रभावी ठरल्यास परिस्थिती अगदी सुधारू शकते.