Emmanuel Macron: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्मानुएल मैक्रोन यांना गर्दीत थप्पड; दोघांना अटक
Emmanuel Macron | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्मानुएल मैक्रोन (Emmanuel Macron) यांना थप्पड लगावण्यात आली आहे. इम्मानुएल मैक्रोन हे दक्षिण फ्रांसमधील एका प्रदेशात दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान ते Walkabout करत असताना गर्दीचा फायदा घेऊन एकाने त्यांना थप्पड (French President Emmanuel Macron Slapped in Face During Walkabout) लगावली. मैक्रोन यांच्या सुरक्षारक्षकांनी तत्काळ झेप घेत थप्पड लगावणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. दरम्यान, थप्पड मारणारा व्यक्ती आणि त्याच्यासोबतच आणखी एका अशा दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन्ही व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

प्राप्त माहितीनुसार, इम्मानुएल मैक्रोन हे दक्षिण फ्रान्स प्रांतातील ड्रॉमा प्रांतात दौऱ्यावर होते. या वेळी ही घटना मंगळवारी (8 जून 2021) घडली. याबाबत BFM TV आणि RMC Radio ने वृत्त दिले आहे. BFM TV आणि RMC Radio ने आपल्या सोशल मीडिया आणि संकेतस्थळावरुन याबाबतचा एक व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. (हेही वाचा, Benjamin Netanyahu Could Lose Job as PM: इस्त्राईलमध्ये सत्तापालटाची चिन्हे; विरोधक आक्रमक, बेंजामिन नेतन्याहू यांच्या खुर्चीला धोका)

BFM TV आणि RMC Radio ने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत दिसते की, राष्ट्राध्यक्ष इम्मानुएल मैक्रोन हे दौऱ्यादरम्यान जनतेला अभिवादन करत प्रत्यक्ष भेटत होते. या वेळी सुरक्षा कुंपनापलीकडे असलेल्या नागरिकांशी इम्मानुएल मैक्रोन हे हस्तांदोलन करत होते. यावेळी हिरव्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेल्या एका व्यक्तीने हस्तांदोलनासाठी डावा हात पुढे केला. मैक्रोन यांनीही त्या व्यक्तीस हस्तांदोलन केले. या वेळी सदर व्यक्तीने राष्ट्राध्यक्षांचा हात पकडून ठेवत उजव्या हाताने जोरदार थप्पड लगावली. दरम्यान, थप्पड लगावणाऱ्या व्यक्तीने तोंडाला मास्क लावला होता आणि चष्माही घातला होता.

Belaaz ट्विट

दरम्यान, इम्मानुएल मैक्रोन यांच्या काही सुरक्षारक्षकांनी झडप घालून सदर व्यक्तीस ताब्यात घेतले. तसेच, काहींनी इम्मानुएल मैक्रोन यांना जनतेपासून तत्काळ दूर आणि सुरक्षीत ठिकाणी नेले. दरम्यान, इम्मानुएल मैक्रोन यांची सुरक्षापाहणाऱ्या विभागानेही त्यांना थप्पड मारण्याचा अज्ञाताकडून प्रयत्न झाल्याचे म्हटले आहे.