Condoms Free for Young People in France: फ्रान्समध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातील लोकांसाठी कंडोम लवकरच मोफत (Condoms Free) उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासंदर्भात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (French President Emmanuel Macron) यांनी घोषणा केली आहे. अवांछित गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमित रोगांचा (एसटीडी) प्रसार कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. मॅक्रॉन पश्चिम फ्रान्समधील पॉईटियर्सचे उपनगर फॉन्टेन-ले-कॉम्टे येथे तरुणांसोबत आरोग्य चर्चेदरम्यान बोलत होते.
गर्भनिरोधकांसाठी ही एक छोटी क्रांती आहे, असं इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले. 18 वर्षांखालील मुलांना लक्ष्य करणारी एक योजना विस्तारित करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये, कंडोमची प्रतिपूर्ती राष्ट्रीय आरोग्य सेवा प्रणालीद्वारे केली जाते. हे सर्व लैंगिक शिक्षणावर आधारित आहे. आपल्या देशात यासंदर्भात यावर बोललं जात नाही. परंतु, हे असे क्षेत्र आहे जिथे आपल्याला शिक्षकांना अधिक चांगले शिक्षण देण्याची गरज आहे, असंही मॅक्रॉन म्हणाले. (हेही वाचा - Free Condoms Distribution: झिकाच्या पार्श्वभूमीवर 'या' ग्रामपंचायतीकडून मोफत कंडोमचे वाटप, कारण घ्या जाणून)
मॅक्रॉन यांनी या परिषदेत फेस मास्क घातला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ते आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत आहेत. कारण सरकारने सुट्टीच्या आधी कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली होती. अद्याप फ्रान्समध्ये मास्क संदर्भात कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. दरम्यान, फ्रान्समधील अधिकारी लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे तसेच कोविड लस बूस्टर शॉट्स घेण्याचे आवाहन करत आहेत.