भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) या दोन देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला असून दहशतवाद्यांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. तसेच भारताकडून ही दहशतवाद्यांना प्रतिउत्तर दिले जात आहे. मात्र भारताकडून हल्ला केला जाणार असल्याच्या भीतीपोटी पाकव्याप्त काश्मीर (POK) येथील दहशतवाद्यांची 4 तळे बंद करण्यात आली आहेत.
याबद्दल गुप्तचर यंत्रणेकडून सरकारला माहिती देण्यात आली आहे. 16 मार्चला पिओके येथील निकिअलमध्ये आयएसआय (ISI)आणि लष्कर-ए-तायबा (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी अश्फाफ बरवाल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत भारत पुन्हा एकदा हल्ला करेल या भीतीने त्यांनी पाकव्याप्त काश्मिर येथील तळे बंद केली आहेत.(हेही वाचा-मसूद अजहरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी अमेरिकेचा प्रस्ताव, फ्रान्स आणि ब्रिटनचा पाठिंबा)
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान कडून या वर्षात 634 वेळा शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. तर गेल्या वर्षी 1629 वेळा दहशतवाद्यांनी शस्रसंधीचे उल्लंघन केले असल्याचे सांगितले जाते.