पेप्सिको कंपनीच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) इंदिरा नूई (Indra Nooyi) आता अॅमेझॉन बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या सभासद झाल्या आहेत. ऑनलाईन शॉपींग सेवा देणाऱ्या अॅमेझॉन या अमेरिकी कंपनीने ही माहिती दिली. भारतीय वंशाच्या असलेल्या इंदिरा नुई यांनी ऑक्टोबरमध्ये पेप्सिको (PepsiCo ) कंपनीच्या CEO (सीईओ) पदाचा राजीनामा दिला होता.
या पूर्वी फेब्रुवारीच्या सुरुवातीला स्टारबक्सच्या कार्यकारी रोजलिंड ब्रेवर यांचाही अॅमेझॉनच्या BOD (बोर्ड ऑफ डायरेक्टर्स) वर समावेश करण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या एका प्रतिक्रियेत म्हटले आहे की, आम्ही या महिन्यात आमच्या BOD मध्ये दोन नव्या सदस्यांना घेत आहोत. रोजलिंड ब्रेवर आणि इंदिरा नूई आपले स्वागत आहे. नूई यांच्याकडे लेखा-परीक्षा समितीची सदस्या म्हणून जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. (हेही वाचा, Amazon मध्ये नोकरीची संधी; भारतात सर्वाधिक जागा)
दरम्यान, ऑक्टोबर 2006 ते ऑक्टोबर 2018 पर्यंत इंदिरा नूई या पेप्सिको कंपनीच्या CEO राहिल्या आहेत. त्यांनी पेप्सिको मे 2007 ते फेब्रुवारी 2019 पर्यंत संचालक मंडळाच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले आहे. 1994 मध्ये इंदिरा नूई पेप्सिको कंपनीशी जोडल्या गेल्या होत्या.