 
                                                                 नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आंतरराष्ट्रीय कंपनी अॅमेझॉनमध्ये (Amazon) नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. 'अॅमेझॉन इंडिया'मध्ये म्हणजे भारतात नोकरीसाठी सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत. भारतात एकूण 1,286 जागा उपलब्ध आहेत. तर चीनमध्ये 467, ऑस्ट्रेलियात 250, जपानमध्ये 381, तर सिंगापूरमध्ये 174 जागा उपलब्ध आहेत.
ई-कॉमर्स आणि क्लाऊड व्यवसाय (AWS) उपक्रमांच्या विकासासाठी अॅमेझॉन नवनव्या योजना आखत आहेत. याशिवाय अॅमेझॉन कंपनी पेमेंट्स, कंटेट (प्राईम व्हिडीओ), व्हॉईस असिस्टन्ट (अलेक्सा), फूड रिटेल आणि कस्टमर सपोर्ट क्षेत्रांतही व्यवसाय करण्याचा अॅमेझॉनचा मानस आहे.
अॅमेझॉन प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी काही कुशल आणि प्रतिभावान उमेदवारांच्या शोधात आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, सल्पाय चेन, कन्टेंट डेव्हलपमेंट, ऑपरेशन्स, स्टुडिओ, वेब डेव्हलपमेंट, संचालन यांसारख्या विविध क्षेत्रात काम करण्यासाठी तरुण, उमद्या उमेदवारांची गरज आहे.
गेल्या दशकात आम्ही भारतात अनेक कुशल उमेदवारांनी नोकरीची संधी दिली. अॅमेझॉनसाठी भारत एक प्रतिभावान उमेदवारांचे भांडार आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
