अमेरिकेतील बियर कंपनीत माथेफिरूकडून बेछूट गोळीबार (PC - twitter)

अमेरिकेतील (America) एका बियर कंपनीत (Beer company) अज्ञाताने बेछूट गोळीबार (Firing) केला. या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पाचही जण मोलसन कूर्स कॉम्प्लेक्सचे (Molson Coors complex) कर्मचारी होते. या हल्ल्यामुळे अमेरिकेतील विस्कॉन्सिन प्रांतात एकच खळबळ उडाली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एक अज्ञात माथेफिरू मोलसन कुर्सच्या कॅम्पसमध्ये शिरला. त्यानंतर त्याने तेथे बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. हल्लेखोराने गोळीबार केला त्यावेळी बियर कंपनीत सुमारे 750 लोक काम करत होते.  (हेही वाचा  - दिल्ली: जपानच्या 'डायमंड प्रिन्सेस' जहाजामध्ये अडकलेले 119 भारतीय मायदेशी परतले)

दरम्यान, बियर कंपनीत गोळीबार करणारा माथेफिरू हा मिल्वोकी येथील रहिवासी होता. या प्रातांचे महापौर टॉम बेरेन यांनी या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील या घटनेची दखल घेतली असून या हल्लेखोराची तुलना राक्षसाशी केली आहे.