Shocking: लिलावामध्ये एका कुटुंबाने जिंकल्या सुटकेस; घरी उघडून पाहताच त्यामध्ये आढळले मानवी मृतदेह!
Suitcase | Image Used For Representational Purpose Only | Pixabay.com

न्युझिलंड (New Zealand) मध्ये एका कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. त्यांना मिळालेल्या सुटकेस मध्ये चक्क मृतदेह भरलेले पाहून तेही हडबडले. मागील आठवड्यामध्ये साऊथ ऑकलंड (south Auckland) मध्ये एक बोली जिंकल्यानंतर त्यांना सुटकेस मिळाल्या होत्या. घरी पोहोचल्यावर त्यांना आढळले की त्यांनी जिंकलेल्या सोडलेल्या सुटकेसमध्ये मानवी अवशेष आहेत.

लिलावापूर्वी खरेदीदारांनी लॉकरमधील सामग्री पाहणे अपेक्षित नसल्यामुळे, कुटुंबाला ते आलेले दिसले नाही. या भीषण घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. न्यूझीलंड पोलिसांनी पुष्टी केली की कुटुंबाचा मृत्यूमध्ये कोणताही सहभाग नाही. NewsHub नुसार, दुर्दैवी घटनेबद्दल त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यासाठी पोलीस मृतदेहांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

NZ Police spokesperson Anna Thompson यांच्या माहितीनुसार, "पोलिसांचे प्राधान्य म्हणजे मृत व्यक्तीची ओळख पटवणे हे आहे जेणेकरुन आम्ही शोधमागील संपूर्ण परिस्थितीचा अंदाज बांधू शकू." Thompson पुढे म्हणाले, "आम्ही अद्याप शवविच्छेदन तपासणी पूर्ण होण्याची आणि निकालाची वाट पाहत आहोत त्यामुळे आम्ही भाष्य करू शकत नाही." हे देखील नक्की वाचा: धक्कादायक! अमेरिकेच्या Texas मध्ये ट्रॅक्टर-ट्रेलर मध्ये सापडले 40 मृतदेह; Migrant Smuggling चा संशय .

सध्या या कुटुंबाकडे जाण्याचा मार्ग बंद केला आहे. शेजार्‍यांना आजूबाजूच्या भागात खूप पोलिस दिसत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या घरामध्ये 3 जण राहतात. ज्यामध्ये एक ज्येष्ठ पुरूष, एक स्त्री आणि 30 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.