Earthquake in Turkey: तुर्की भुकंपामुळे हादरला, इमारती कोसळण्यासह 17 जणांचा बळी तर जवळजवळ 700 हून अधिक जण जखमी
Earthquake in Turkey (Photo Credits: ANI)

Earthquake in Turkey:  तुर्की येथे जबरदस्त भुकंपाचे धक्के जाणवले आहे. यामुळे तुर्की हादरला असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भुकंपाच्या धक्क्यांमुळे काही इमारती सुद्धा कोसळून पडल्या आहेत. तुर्की मधील मीडियानुसार, या भुकंपाच्या घटनेत 17 जणांचा बळी गेला आहे. तर 700 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भुकंपाचे धक्के हे रिश्टर स्केल 7.0 असल्याची नोंद झाली . असे मानले जात आहे की, इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली अडकल्यांचे बचाव कार्य करताना हा आकडा अधिक वाढू शकतो. तुर्कीतील तिसरे सर्वाधिक मोठे शहर इजमिर मध्ये भुकंपामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथे बहुतांश मोठ्या इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. या व्यतिरिक्त यूनान मधील सामोस मध्ये सुद्धा भुकंपामुळे नुकसान झाले आहे.

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी बचाव कार्य मोठ्या स्तरावर सुरु आहे. इजमिर येथे विशाल इमारती कोसळल्याने ढिगारे हटवण्याचे काम सुरु झाले आहे. तर यापूर्वी तुर्कीने भुकंपामुळे झालेला विध्वंस झालेला पाहिला आहे. 1999 मध्ये भुकंपामुळे अशी परिस्थिती उद्भवली होती की, त्यामध्ये 17000 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच भुकंपाच्या धक्क्यांमुळे जानेवारीत तुर्कीतील सिव्रीस मध्ये 30 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 1600 हून अधिक जण जखमी झाले होते.(Vietnam Floods: 'व्हिएतनाम'मध्ये पावसाचा हाहाकार; पूर व भूस्खलनांमुळे 90 लोकांचा मृत्यू, 34 लोक बेपत्ता)

Tweet:

Tweet:

दरम्यान, तुर्की येथे झालेल्या भुकंपाच्या घटनेमुळे तेथील आरोग्यमंत्री फखरुद्दीन ख्वाजा यांनी ट्विट करत असे म्हटले की, 38 रुग्णवाहिका, दोन रुग्णवाहिका हेलिकॉप्टर, 35 वैद्यकिय टीम इजमिर येथे आपले कार्य बजावत आहेत. तसेच एनडीआरफच्या विभागाकडून जवळजवळ 12 इमारतींमध्ये बजाव कार्य सुरु करण्यात आले आहे. विभागाने असे सांगितले की, भुंकपांचे केंद्र एजियन सागर मध्ये 16.5 किलोमीटर खाली होता.