Donald Trump | (Photo Credits: donaldjtrump.com)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प (Donald Trump Resigns) यांच्या राजीनाम्याच्या बातमीने अमेरिकेत बुधवारी (15 जानेवारी) मोठी खळबळ उडाली. जगपरसिद्ध अशा वॉशिंग्टन पोस्टच्या (Washington Post) पहिल्या पानावर भव्य मथळ्याखाली हे वृत्त छापण्यात आले होते. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने केवळ अमेरिकाच नव्हे तर, जगभर पसरली. अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. मात्र, काही वेळातच सत्य समोर आले. हा उद्योग म्हणजे फेक न्यूज देणाऱ्या लोकांचा प्रपोगंडा होता. खुद्द वॉशिंग्टन पोस्टने (Fake Washington Post) या वृत्ताचे खंडण केले. तसेच, हे वृत्त आमचे नाही. काही उपोद्यापी मंडळींनी वॉशिग्टन पोस्टच्या बनावट प्रती छापून वाटल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले.

वॉशिग्टन पोस्टने सोशल मीडियावरील आपल्या अधिकृत पेजवर पोस्ट लिहून सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजीनाम्याबाबत वृत्त देण्यात आलेल्या वॉशिग्टन पोस्टच्या प्रती या नकली आहेत. आमच्या आजच्या अंकाच्या (ताज्या) मूळ प्रतिंमध्ये असे कोणत्याही प्रकारचे वृत्त देण्यात आले नाही. काही संकेतस्थळं (Website) आमची कॉपी करतात हे आमच्या निदर्शनास आले आहे. पण, त्यांचा आमच्याशी काहीच संबंध नाही. या प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली असून, तपास सुरु केला आहे. (हेही वाचा, 'बाय..बाय' म्हणत डोनाल्ड ट्रम्प यानी बैठकीतून घेतला काढता पाय)

ट्रम्प यांच्या राजीनाम्याचे वृत्त दिलेल्या वृत्तपत्राच्या प्रतिंचे वैशिष्ट्य असे की, या वृत्तपत्राच्या अंकाच्या प्रती दिसायला हुबेहुब वॉशिंग्टन पोस्ट सारख्याच आहेत. या अंकाच्या मुखपृष्टाची हेडलाईन 6 कॉलम होती आणि यात अत्यंत मोठ्या आक्षरांमध्ये लिहिले होते 'अनप्रेसिडेंटेड' म्हणजेच 'राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार'. या वृत्तात ट्रम्प यांचा रागाने लालबूंद झालेला आणि मान झुकवलेला फोटोही या वृत्तासोबत छापण्यात आला होता. फोटोखाली लिहिले होते लवकरच व्हाईट हाऊस सोडणार. वृत्तपत्राच्या पानाच्या डाव्या बाजूला लिहिले होते ट्रम्प यांचा कार्यकाळ संपताच जगभरात आनंदाची लाट. मात्र, या अंकावर 1 मे 2019 अशी तारीख छापण्यात आली होती. त्यामुळे काही लोकांना या अंकातील गौडबंगाल लगेच लक्षात आले. काहींना मात्र उशीरपर्यंत हे समजू शकले नाही.

Fake copies of Washington Post handed out in DC | (Photo: Twitter/Ian )

दरम्यान, ट्रम्प यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचा बनावट अंक सोशल मीडियावर भालताच व्हायरल झाला आहे.