काश्मीर प्रश्नी नरेंद्र मोदी आणि इमरान खान यांची इच्छा असल्यास मध्यस्थी करायला आवडेल- डोनाल्ड ट्रम्प
Donald Trump, Narendra Modi, Imran Khan (Photo Credits: PTI)

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) अमेरिका दौऱ्यावर असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी काश्मीर प्रश्नी (Kashmir) एक मोठे विधान केले होते. भारत पाकिस्तानात कित्येक वर्ष सुरु असणाऱ्या या वादाला सोडवण्यासाठी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi)  यांनी आपल्याला मध्यस्थीसाठी विनंती केली होती असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं होतं. यानंतर भारताच्या परराष्ट्र खात्याने हे वक्तव्य फेटाळलं. त्यानंतर आता याच संदर्भात ट्रम्प यांचं नवं विधान समोर आलं आहे. यानुसार, भारत पाकिस्तान (India- Pakistan) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमरान खान यांची इच्छा असल्यास आपल्याला काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करायला आवडेल असे ट्रम्प यांनी म्हंटले आहे. डोनाल्ड ट्रम्प च्या वक्तव्यावर भारताची प्रतिक्रिया पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हैराण, ट्विट करुन व्यक्त केले मत

ANI या वृत्तसंस्थेच्या ट्विटनुसार, ट्रम्प यांनी आपण काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व इम्रान खान यांना भेटलो असे म्हणत ही दोन्ही माणसे मला खूप आवडली, त्यांच्यात काश्मीर प्रश्न कित्येक वर्ष रखडून आहे. याबाबत मी पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली आहे मात्र या दोघांनी चर्चा करण्याची गरज आहे , मात्र यामध्ये मी मध्यस्थी करायची की नाही हा मोदीं आणि खान यांचा निर्णय असेल असे वक्तव्य केले तसेच ही मंडळी अतिशय उत्तम नेते असून त्यांनी एकत्र आल्यास काय कमाल होईल याची मी कल्पना करू शकतो असेही ट्रम्प यांनी म्हंटले आहे.

ANI ट्विट

हेही वाचा- काश्मीर प्रश्न हा भारत-पाकिस्तान मधील द्विपक्षीय मुद्दा; भारताच्या दाव्यानंतर अमेरिकेचा बचावात्मक पवित्रा

दरम्यान ट्रम्प यांच्या पूर्वीच्या वक्तव्यावर भारताकडून राजकीय स्तरावर बरीच टीका झाली होती, ज्यानंतर अमेरिकेने बचावत्मक पवित्र स्वीकारून काश्मीर हा पूर्णतः द्विपक्षीय मुद्दा असून यात अमेरिकेने हस्तक्षेप करण्याचे कारण नाही असे सांगितले होते.यानुसार ट्रम्प यांनी सुद्धा आता आपल्या शब्दांमध्ये बदल करून दोन्ही देशांची इच्छा असेल तरच आपण मध्यस्ती करू असे म्हंटले आहे