डोनाल्ड ट्रम्प च्या वक्तव्यावर भारताची प्रतिक्रिया पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हैराण, ट्विट करुन व्यक्त केले मत
Imran Khan (Photo Credits: IANS)

काश्मीर मुद्द्यासंबंधी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump) यांनी केलेल्या वक्तव्याने संपूर्ण भारतात हंगामा सुरु झाला आहे. भारतात सुरु झालेल्या या हंगाम्याला पाहून पाकिस्तान प्रधानमंत्री इमरान खान (Imran Khan) यांनी नुकतेच एक स्पष्टीकरण दिलं आहे. यात ते असे म्हटले आहेत की, ज्याप्रकारे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्यास तयार आहे असे म्हटले असले तरीही भारताचा यावरील व्यवहार पाहून आपण हैराण झालो आहोत. खरे पाहता गेल्या 70 वर्षांपासून कश्मीरचे लोक या मुद्द्याला घेऊन त्रस्त झाले आहेत.

तसेच इमरान खान या ट्विटमध्ये असेही म्हणाले आहे की, 'जर काश्मीर मुद्द्यावर खुद्द डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करण्यास तयार आहेत,तर भारत असा का व्यवहार करत आहे.'

काश्मीर मधील जनताही या गंभीर मुद्द्यामुळे गेल्या 70 वर्षांपासून पिळवटून निघत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे, असे इमरान खान यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा- काश्मीर प्रश्न हा भारत-पाकिस्तान मधील द्विपक्षीय मुद्दा; भारताच्या दाव्यानंतर अमेरिकेचा बचावात्मक पवित्रा

पंतप्रधान इमरान खान 3 दिवसीय अमेरिका दौ-याला गेले होते. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी काश्मीर मुद्द्यावर वक्तव्य केले होते. ट्रम्प च्या वक्तव्यावर संपुर्ण भारतभर तीव्र पडसाद उमटले होते.