भारतीय वस्तूंवर 25 टक्के आयात कर लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
File image of US President Donald Trump | (Photo Credits: PTI)

भारत (India) हा आयात केलेल्या वस्तूंवर जास्त कर लावत असल्याची टीका अमेरिका (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केली आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये येणाऱ्या भारतीय वस्तूंवर सुद्धा अधिक कर लावण्यात येणार असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. .परंतु हा कर 25 टक्के असणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

मेरीलँड मधील वॉशिंग्टनमध्ये आयोजित केलेल्या एका परिषदेमध्ये भारताकडून आयात केलेल्या वस्तूंवर जास्त कर लादण्यात येत आहे. परंतु सध्या चीन सोबतही आयात करावरुन ट्रम्प यांचे त्यांच्याशी व्यापार युद्ध सुरु असल्याची भुमिका त्यांनी यावेळी मांडली होती. (हेही वाचा-ओसामा बिन लादेनचा मुलगा हाजमा बिन लादेन वर अमेरिकेने जाहीर केला 1 मिलियन डॉलरचा इनाम)

तसेच परिषदेमध्ये त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. जागतिक प्रश्न, देशांतर्गत मुद्दे आणि द्विपक्षीय संबंध याबाबतही ट्रम्प यांनी सांगितले. तसेच अमेरिकेतून बाईक पाठवल्या जातात तेव्हा शंभर टक्के कर लादण्यात येतो. मात्र भारतातून अमेरिकेला पाठवण्यात येणाऱ्या बाईकवर कर लादत नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.