ओसामा बिन लादेनचा मुलगा हाजमा बिन लादेन वर अमेरिकेने जाहीर केला 1 मिलियन डॉलरचा इनाम
Hamza-Bin-Laden (Photo Credit: Twitter)

अमेरिकेतील न्युयॉर्क (New York) स्थित वर्ल्ड ट्रेड सेंटरवर (World Trade Center) हल्ला केल्याचा बदला म्हणून अमेरिकेने ओसामा बिन लादेनचा (Osama bin Laden) खात्मा केला. मात्र आता ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा बिन लादेन (Hazma bin Laden) हा वडीलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कट रचत असून तो अमेरिकेवर दहशतवादी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हाजमा काही पाऊले उचलण्यापूर्वीच तो अमेरिकेला हवा असून त्याच्यावर अमेरिकेने 1 मिलियन डॉलर म्हणजे 1 दक्षलक्ष डॉलरचे बक्षिस जाहीर केले आहे.

अमेरिकेचे अधिकारी नॉथन सेल्स यांनी सांगितले की, अल कायदा ही दहशतवादी संघटना गेल्या काही दिवसांपासून शांत आहे. मात्र ही शांतता म्हणजे शरणागती नसून यामागे मोठा कट रचला जात आहे. आता आम्हाला कोणतीही चूक करायची नाही. आमच्यावर हल्ला करण्याची क्षमता आणि कारणं दोन्हीही अल कायदा या दहशतवादी संघटनेकडे आहे.

दोन वर्षापूर्वी जागतिक दहशतवादी म्हणून अमेरिकेने अधिकृतपणे घोषित केलेल्या हजाझा बिन लादेन हा सुमारे 30 वर्षांचा आहे. त्याने मोहम्मद अत्ताच्या मुलीशी विवाह केला आहे. 2001 मध्ये झालेल्या न्युयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर टॉवरवरील हल्ल्यात मोहम्मद अत्ताचा हात होता. चार पैकी एक विमान हायजॅक करण्यात मोहम्मद अत्ताचा सहभाग होता.