
Argentina Earthquake: दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनामध्ये काल शुक्रवारी भूकंपाचे तीव्र धक्के (Argentina Earthquake) जाणवले. ज्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 मोजण्यात आली. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की जमिनीत जोरात कंप झाले. हवामान खात्याने चिलीपर्यंत त्सुनामीचा इशाराही जारी केला आहे. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी 6.30 वाजता हा भूकंप झाला. त्यानंतर लोकांमध्ये भितीनिर्माण झाली. काही ठिकणी गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. सर्वजण आपापल्या घराबाहेर पडले. 7.5 रिश्टर स्केलच्या भयानक भूकंपानंतर अर्जेंटिना आणि चिलीमध्ये काय परिस्थिती आहे आणि भूकंप झाला तेव्हाचे दृश्य काय होते? जाणून घेऊया. Myanmar Earthquake Death Toll: म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भयानक भूकंपात आतापर्यंत जवळजवळ 700 लोकांचा मृत्यू; 1600 जखमी, मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू
लोक घराबाहेर पळून गेले
अर्जेंटिना आणि चिलीमध्ये झालेल्या 7.5 तीव्रतेच्या भूकंपामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. लोक घरे सोडून पळून जाताना दिसले. सर्वजण आपल्या कुटुंबासह आपले प्राण वाचवण्यासाठी मोकळ्या जागेत आले.
भूकंपाचा भयानक व्हिडिओ
अर्जेंटिना आणि चिलीमध्ये झालेल्या भूकंपाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भूकंपाचे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले लोक घाबरले आणि गोंधळ उडाला.
🚨🇦🇷#BREAKING | NEWS ⚠️
New video showing a massive landslide after the 7.5⚡️
Magnitude earthquake that struck Argentina and Chile 🇨🇱 earlier today. pic.twitter.com/2K21Qaizxu
— Todd Paron🇺🇸🇬🇷🎧👽 (@tparon) May 2, 2025
लोक रस्त्यावर आले
भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोक घराबाहेर पडले. अर्जेंटिनाच्या रस्त्यांवरील लोकांची गर्दी पाहून, तिथले वातावरण कसे असेल याची कल्पना करू शकतो. काही ठिकणी गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. घरातील सामान खाली पडत होते.
इमारती खेळण्यासारख्या हलताना दिसल्या
भूकंप इतका जोरदार होता की अर्जेंटिनामधील घरे आणि इमारती खेळण्यांच्या घरांसारख्या हादरू लागल्या. जर परिस्थिती म्यानमारसारखी झाली असती तर मोठी जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले असते.
🚨🇦🇷More Video from the
7.5 ⚡️Magnitude earthquake that has struck Argentina. pic.twitter.com/ThHSJtfYNK
— Todd Paron🇺🇸🇬🇷🎧👽 (@tparon) May 2, 2025
कोणत्याही नुकसानीची माहिती नाही
चिली आणि अर्जेंटिनाच्या किनाऱ्याजवळ दक्षिण अटलांटिक महासागरात 7.5 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपामुळे चिलीमधील हजारो लोकांना त्सुनामीच्या भीतीमुळे विरळ लोकवस्ती असलेल्या किनारी भागातून उंच ठिकाणी स्थलांतर करावे लागले. अद्याप कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त नाही. पण भूकंपाचे जे व्हिडिओ समोर आले ते निश्चितच हृदयद्रावक होते. घरे हादरणे, वस्तू पडणे आणि जमीन हादरणे हे दृश्य कोणालाही घाबरवू शकते.