Dawood Malik Shot Dead: भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याची पाकिस्तानात हत्या; दाऊद मलिकचा अज्ञात हल्लेखोरांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मृत्यू
Dawood Malik (PC - Twitter)

Dawood Malik Shot Dead: भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना ठार मारण्याची प्रक्रिया पाकिस्तानमध्ये सुरू झाली आहे. अलीकडेच, या यादीत दोन नवीन नावे आली होती, त्यापैकी एक शाहिद लतीफ होता, जो पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे म्हटले जाते. दुसरा दहशतवादी आयएसआय एजंट मुल्ला बहूर उर्फ ​​होर्मुझ आहे, जो पाकिस्तानमध्ये अज्ञात लोकांच्या गोळीबाराचा बळी ठरला. आता दाऊद मलिक (Dawood Malik) ची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या (Murder) केली असून तो 'जैश-ए-मोहम्मद' या जागतिक दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा जवळचा असल्याचे बोलले जात आहे. 'जैश-ए-मोहम्मद' व्यतिरिक्त दाऊद मलिक लष्कर-ए-जब्बार आणि लष्कर-ए-जंगवीशीही संबंधित होता. मसूद अझहर, हाफिज सईद, लखवी आणि दाऊद इब्राहिम इत्यादींना भारत सरकारने UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे.

भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफ हा पाकिस्तानातील गुजरांवाला येथील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वीच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या होत्या. शाहिद लतीफ हा 2016 च्या पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे सात जवान शहीद झाले होते. शाहिदने आयएसआयकडून विशेष प्रशिक्षण घेतले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने लतीफला सियालकोट सेक्टरच्या प्रमुखाची जबाबदारी दिली होती. (हेही वाचा - Israel-Hamas War: तुम्ही प्राण्यांसारखे वागलात त्यामुळे तुम्हाला तसाच मृत्यू मिळेल; इस्रायलच्या मंत्र्याने हमासला दिला कडक इशारा)

दुसरा दहशतवादी आयएसआय एजंट मुल्ला बहूर उर्फ ​​होर्मुझ आहे. बलुचिस्तान भागात त्याला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. बहुरने कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करून त्यांना आयएसआयच्या ताब्यात दिलं होतं. भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. याविरोधात भारताने हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. तेथून कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे.

याशिवाय 20 फेब्रुवारीला रावळपिंडीत बशीर अहमद पीर उर्फ ​​इम्तियाजवर गोळ्या झाडण्यात आल्या. केंद्र सरकारच्या दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश होता. पाकिस्तानातून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचे त्याचे काम होते. आयएसआयने त्याला हिजबुल मुजाहिद्दीनचे लॉन्च पॅड हाताळण्याची जबाबदारी दिली होती. गेल्या महिन्यात 'लष्कर-ए-तैयबा'चा प्रमुख हाफिज सईदचा जवळचा सहकारी अबू कासिम याला रावळकोटमध्ये गोळ्या घालण्यात आल्या होत्या. खलिस्तान कमांडो फोर्सचा दहशतवादी आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड परमजीत सिंग पंजवाड याचीही पाकिस्तानात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.