दक्षिण अफ्रिकेत कोरोना व्हायरसच्या नव्या वेरियंटमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. देशातील वायरोलॉजिस्ट ट्युलियो डी ओलिवेरा यांनी गुरुवारी मीडियाशी बोलताना म्हटले की, दक्षिण अफ्रिकेत मल्टीपल म्युटेशन होणारा कोरोनाचा वेरियंट समोर आला आहे. त्यानंतर युके कडून 6 अफ्रिकी देशांवर प्रवासावर अस्थायी रुपात बंदी घातली आहे. उड्डाणे रद्द करण्यासंबंधित माहिती युकेचे आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी दिली आहे. याच दरम्यान डब्लूएचओने आपत्कालीन बैठक सुद्धा बोलावली आहे.
जाविद यांनी असे म्हटले की, युकेएचएसए एक नव्या वेरियंटचा तपास करत असून अधिक डेटाची आवश्यकता आहे. परंतु आता आम्हाला अधिक सावधगिरी बाळगावी लागत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, शुक्रवारी दुपारी सह अफ्रिकी देशांना रेड लिस्ट मध्ये टाकण्यात आले आहे. त्यांच्यावर अस्थायी रुपात प्रतिबंद लावण्यात आले असून ब्रिटेनच्या प्रवाशांना क्वारंटाईन रहावे लागणार आहे.(COVID19 व्यतिरिक्त पाकिस्तानवर आता डेंगूचे संकट, इस्लामाबाद नंतर पंजाबमध्ये रुग्ण संख्येत वाढ)
कोरोनाच्या नव्या वेरियंटला वैज्ञानिकांनी B.1.1.529 असे नाव दिले आहे. तो वेरियंट ऑफ कंसर्न असल्याचे ही म्हटले. त्याचसोबत डब्लूएचओने आपत्कालीन बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. ओलिवेरा यांनी पुढे म्हटले की, दक्षिण अफ्रिकेत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमागील मुख्य कारण म्हणजे मल्टीमल म्युटेशन असणारा हा वेरियंट आहे.
साजिद जाविद यांनी म्हटले की, आम्ही सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेत आहोत. सातत्याने लसीकरणाचा वेग ही वाढवत आहोत. थंडीटे दिवस सुरु होत असल्याने आम्ही स्थितीवर अत्यंत करडी नजर ठेवून असणार आहोत.
दरम्यान, भारतात सुद्धा दक्षिण अफ्रिका, हॉगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे निर्देशन दिले गेले आहेत. तर केंद्र सरकारने राज्यांना विशेष सावधगिरी बाळगण्यास सांगितली आहे. राज्यांना असे सांगण्यात आले आहे की, त्यांनी दक्षिण अफ्रिका, हॉगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची नीट तपासणी करावी. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करु नये.