Dengue | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Dengue in Pakistan: पाकिस्तानात डेंग्यूची प्रकरणे आता वाढत आहेत. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गेल्या 24 तासात 277 प्रकरणे समोर आली असून चार जणांचा बळी गेला आहे. एआरवाई न्यूज यांनी शनिवारी आरोग्य विभागाच्या हवाल्याने म्हटले की, या काळात डेंग्यूच्या तापामुळे मृतांचा आकडा 90 वर पोहचला आहे. लहौर मध्ये दोन आणि गुजरांवाल आणि अटक येथे एक-एक मृत्यू झाला आहे.(Japan: रुग्णालयाचा निष्काळजीपणा! तब्बल 30 वर्षे पिण्यासाठी वापरले शौचालयासाठी असलेले पाणी; उपाध्यक्षांनी मागितली जाहीर माफी)

स्थानिक आरोग्य सचिव इमरान सिकंदर बलूच यांनी म्हटले की, पाकिस्तानी मीडियाने सांगितले लाहौर येथूनच 225 नवे रुग्ण समोर आले आहेत. या काळात आता जिल्ह्यात डेंग्यूचा आकडा 20,835 वर पोहचला आहे. सचिवांनी म्हटले की, डेंग्युचा तापामुळे एकूण 1854 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार केले जात आहेत.त्यामधील 1215 हे लहौर येथील आहेत.(पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांना इमरान खान यांच्या सरकारने दिले आदेश, बातमीपूर्वी दाखवावा देशाचा नकाशा)

Tweet:

या व्यतिरिक्त इस्लामबाद मध्ये गेल्या 24 तासात डेंग्युच्या तापामुळे आणखी 23 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, आजाराचे 11 रुग्ण हे ग्रामीण भागातील तर 12 रुग्ण शहरातील आहेत. इस्लामाबाद येथे डेंग्युमुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे.