Imran Khan (Photo Credits-Twitter)

Pakistan: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या सरकारने देशातील वृत्तवाहिन्यांना एक आदेश दिला आहे. त्यानुसार, दररोज वाहिनीवर पाकिस्तानचा नकाशा दाखवावा असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक्स मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटी (PEMRA) ने एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून हा आदेश दिला आहे. त्यामुळे न्यूज बुलेटिपूर्वी 2 सेकंदासाठी पाकिस्तानचा पॉलिटिकल नकाशा दाखवला जाणार आहे.(Cities to be Submerged: पुढील 9 वर्षात जगातील 9 मोठी शहरे बुडण्याच्या धोका; भारतामधील 'या' शहराचा समावेश)

पेमरा यांच्या आदेशानुसार, तेथील खासगी आणि सरकारी दोन्ही वृत्तवाहिन्यांना दररोज रात्री 9 वाजता न्यूज बुलेटिनच्या सुरुवीच्या आधी 2 सेकंदासाठी देशाचा नकाशा दाखवावा लागणार आहे. त्यामुळे आता वृत्तवाहिन्यांना या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.(Pakistan’s Inflation: पाकिस्तानमधील महागाईने मोडला गेल्या 70 वर्षातील विक्रम; गगनाला भिडले मैदा, तेल, साखर, डाळींचे भाव)

दरम्यान, देशाचा नकाशा दाखवण्यासंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या पत्रात सुचना आणि प्रसारण मंत्रालयाचा हवाला देण्यात आला आहे. तर पेमरा पाकिस्तानची मीडिया अथॉरिटी आहे. यापूर्वी सुद्धा पेमरावर वृत्तवाहिन्यांच्या विरोधात काही आदेशांच्या माध्यमातून कठोर नीति अवलंबल्याचा आरोप लावण्यात आला आहे.