COVID-19 Vaccine Sputnik V Update: रशियाच्या पहिल्या कोविड 19 वरील लसीचे 85% रूग्णांवर दुष्परिणाम नाहीत; विकासकांचा दावा
Sputnik V vaccine | (Photo Credits: Yalç?n Sonat / 123rf)

जगभरात कोरोना वायरस धुमाकूळ घालत असताना त्याला रोखण्यासाठी सर्वप्रथम रशिया कडून लस निर्माण करण्यात आली आहे. Sputnik V,ही लस आता रशियामध्ये देण्यास सुरूवात झाली आहे. Gamaleya Research Institute of Epidemiology and Microbiology ज्यांनी ही लस बनवली आहे त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, लसीच्या पहिल्या डोस नंतर सुमारे 85% लोकांमध्ये त्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसलेले नाहीत. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin यांनी 11 ऑगस्टला दिलेल्या माहितीनुसार, रशियाने कोविड 19 विरूद्ध पहिली लस नोंदवली आहे. त्यानंतर रूग्णांवर लस देण्यात आली आहे. नक्की वाचा: Russian Research Centre मध्ये COVID-19 आणि Flu शी सामना करणारं Combined Vaccine बनवण्याचे प्रयत्न सुरू; जाणून घ्या रशियामधील कोविड 19 लसीबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स.

दरम्यान सध्या Sputnik V या लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू आहे. Alexander Gintsburg यांनी Sputnik News ला दिलेल्या माहितीनुसार, 85% लोकांवर लसीचे डोस दिल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम समोर आलेले नाहीत तर उर्वरित 15% लोकांवर त्याचे दुष्परिणाम आहेत.

Russian Direct Investment Fund (RDIF) हे या लस निर्मितीमधील को- डेव्हलपर आहेत. रशियाकडून कोरोना विरुद्ध लढण्यासाठी दुसरी लस नोंदवण्यात आली आहे तर तिसर्‍या लसीसाठी प्रयत्न सुरू आहेत. EpiVacCorona ही रशियाची कोविड 19 विरूद्ध लढणारी दुसरी लस नोंदवण्यात आली आहे. Vector Centre कडून ती बनवण्याचं काम सुरू आहे. तर Chumakov Centre ने तिसरी लस बनवण्याचं काम हाती घेतलं आहे.

Sputnik V ही कोविड 19 विरूद्धची लस आता भारतामध्ये येण्यास सज्ज आहे. रशियाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या लसीचे सुमारे 100 दशलक्ष डोस हे भारताच्या Dr Reddy Laboratories ला दिले जाणार आहे. भारतातील रेड्डी लॅबोरेटरी ही खाजगी लॅब मॉस्कोसोबत पार्टनरशिप करून त्याचे क्लिनिकल ट्रायल्स करणार आहे.