युके (UK) ची फार्मा कंपनी अॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) आणि ऑक्सफर्ड (Oxford) ने विकसित केलेल्या कोविड-19 लसीच्या (Covid-19 Vaccine) क्लिनिकल ट्रायल्स रशिया (Russia) विकसित Sputnik V सोबत करण्याचा कंपनीचा मानस आहे, अशी माहिती रॉयटर्स ने (Reuters) दिली आहे. युके विकसित लस अधिक प्रभावी करण्याच्या यामागील हेतू असल्याचे RDIF ने म्हटले आहे. RDIF (Russia’s Sovereign Wealth Fund) ने Sputnik V लसीच्या विकासासाठी वित्तपुरवठा केला आहे. या दोन्ही लसींच्या एकत्रितपणे ट्रायल्स या वर्षाअखेरीस पासून सुरु होण्याची शक्यता आहे. (Sputnik V Vaccine Update: भारतामध्ये HETERO सोबत RDIF करणार कोविड 19 वरील लसीचं उत्पादन)
यासंदर्भात अॅस्ट्रॅजेनेकाने एक पत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी दोन्ही वेगळ्या लसीच्या एकत्रिकरणाचा काय परिणाम होतो, हे तपासण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी रशियाच्या गमलेया संस्थेशी (Gamaleya Institute) हातमिळवणी केली आहे. गमलेया संस्थेने Sputnik V लसीची निर्मिती केली आहे. याद्वारे कॉमन कोल्ड व्हायरस बेस्ड दोन वेगळ्या लसी एकत्रितपणे कसे काम करतात, हे पाहिले जाईल. मॉस्को साठी ही अतिशय सकारात्मक बातमी असेल. कारण यामुळे पाश्चिमात्य देशांकडून कोविड-19 वरील लसीला मान्यता मिळण्यासाठी मॉस्कोची प्रतिक्षा आता संपली आहे. (Pfizer's COVID-19 Vaccine घेतलेल्या युके मधील दोन जणांना अॅलर्जिक रिअॅक्शन; MHRA ने दिल्या 'या' सूचना)
Sputnik V लसीच्या क्लिनिकल ट्रायल्स सध्या सुरु आहेत. परंतु, अंतरिम डेटानुसार लस कोविड-19 वर 90 टक्के प्रभावी आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला युके ने सांगितले की, फायझर-बायोटेकच्या कोविड-19 लसीच्या क्लिनिकल ट्रायल्स अॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफर्ड लसीसोबत सुरु करण्यात येणार आहेत. दोन लसीच्या एकत्रिकरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते का, हे पाहण्यासाठी लसीचा अभ्यास करण्यात येणार आहे, असे युके ने सांगितले आहे.