Snake | image only representative purpose (Photo credit: Pixabay)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) महामारीने संपूर्ण जगात उलथापालथ घडवली आहे. या प्राणघातक विषाणूमुळे लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जात आहे. मात्र अजूनही लसीचे दोन्ही डोस या विषाणूपासून पूर्णतः संरक्षण देत असल्याचे दिसून आले नाही. आता ब्राझीलच्या (Brazil) शास्त्रज्ञांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले आहेत की, त्यांना कोरोनावरील औषध सापडले आहे. संशोधकांना असे आढळून आले आहे की ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या एका खास सापाचे विष (Brazilian Viper Venom) कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी प्रभावी ठरू शकते.

एका अहवालात म्हटले आहे, संशोधकांना असे आढळून आले आहे की सापाच्या विषात सापडलेल्या अणुने माकडांच्या पेशींमध्ये कोरोनाचे पुनरुत्पादन रोखले आहे. ही गोष्ट विषाणूचा सामना करण्यासाठी औषधाच्या दिशेने संभाव्य पहिले पाऊल मानले जात आहे. मानवांमध्ये या विषाच्या परिणामाबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. विषामधील हा पदार्थ मानवी पेशींवरही तपासला जाऊ शकतो, अशी आशा संशोधकांनी व्यक्त केली आहे.

या महिन्यात सायंटिफिक जनरल मॉलिक्यूल्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, Jararacussu Pit Viper ने माकडांच्या पेशींमध्ये व्हायरसची वाढण्याची क्षमता 75 टक्क्यांनी कमी केली. सापाच्या विषाचा हा भाग विषाणूच्या विशिष्ट प्रथिनांना रोखू शकतो हे आम्ही दाखवू शकलो, असे सो पाउलो विद्यापीठाचे प्राध्यापक राफेल गुइदो म्हणाले. हा घटक पेप्टाइड किंवा अमीनो एसिडची चेन आहे. (हेही वाचा: South Africa मध्ये सापडला Covid-19 चा आतापर्यंतचा सर्वात संसर्गजन्य व्हेरिएंट C.1.2; कोरोना लसीवरही देऊ शकेल मात)

Jararacussu हा ब्राझीलमधील सर्वात लांब सापांपैकी एक आहे, त्याची लांबी सुमारे 6 फूट आहे. गुइडोने एका मुलाखतीत सांगितले की, पेप्टाइडला त्याच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते. या घटकाला प्रयोगशाळेत संश्लेषित केले जाऊ शकते, यासाठी साप पकडणे आवश्यक नाही.