Coronavirus: वुहान मधील 100 वर्षीय वृद्धाने केली कोरोना व्हायरसवर मात
Coronavirus (Photo Credits- IANS)

जगभरावर ओढवलेल्या कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) भीतेने मागील काही दिवसात अनेकांनी घराबाहेर पडणेही सोडल्याचे आपण ऐकले असेल, हा आजार किती गंभीर आहे, यामुळे जगभरात किती मृत्यू झालेत याचे आकडे ऐकून कोणीही व्यक्ती याचा धसका घेईल यात काही आश्चर्य नाही, पण आता समोर येत असणाऱ्या एका वृत्तानुसार चीन (China) मधील एका व्यक्तीने या कोरोना व्हायरसवर मात केल्याचे दिसून येतेय, त्यातही विशेष म्हणजे ही व्यक्ती तब्बल 100 वर्षाचे एक वृद्ध आहेत, ज्या वुहान (Wuhan) येथून कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाली त्याच ठिकाणी हॉस्पिटल मध्ये उपचार घेऊन ठणठणीत झालेल्या या व्यक्तीलला डिस्चार्ज देण्यात आला आहे. केरळमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा कोरोना विषाणूची लागण; भारतातील एकूण रुग्णांची संख्या 40

चीनच्या मीडिया रिपोर्ट नुसार, शनिवारी वुहान येथील एका कोरोना रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. या व्यक्तीला 24 फेब्रुवारी रोजी हुबेई येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, सुरुवातीला श्वसनाचा त्रास असल्याने चाचणी करताच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते, एवढंच नाही तर या व्यक्तीला कोरोना सोबतच अल्झायमर, हायपर टेन्शन आणि हृदयाचे अनेक आजार होते, त्यानंतर सलग दोन आठवडे उपचार घेतल्यावर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. 7 मार्च रोजी त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला.

ANI ट्वीट

दरम्यान, या वृद्ध व्यक्तीच्या धैर्याचे सध्या सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. ज्या आजाराची केवळ चाहूल लागताच सुद्धा भीतीचे वातवरण तयार होते त्या आजारावर मात केल्याने या व्यक्तींना अनेक रुग्णांना दिलासा दिला आहे. हा आजार झाला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही कारण आता आजार बरा होऊ शकतो याचे ताजे उदाहरण जगासमोर आले अशा प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी या वृत्तावर नोंदवल्या आहेत