Coronavirus:जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 1.11 कोटी पेक्षाही अधिक
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेतील जॉन्स हॉपकिंन्स यूनिवर्सिटीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या 1.11 कोटी पेक्षाही अधिक झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 528,000 हून अधिक झाली आहे. जॉन्स हॉपकिंन्स यूनिवर्सिटी संचलीत सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग (CSSE) जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या दैनंदिन जाहीर करत असते. त्यानुसार रविवारी सकाळपर्यंत जगभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 11,199,747 तर कोरनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 528,953 इतकी झाली आहे.

सीएसएसईने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या अमेरिकेत अधिक आहे. अमेरिकेत आजघडीला 2,838,678 इतके कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. तर 129,672 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेपाठोबाठ कोरोना व्हारस संक्रमित राष्ट्रांमध्ये ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राजीलमध्ये 15390881 इतके कोरोना संक्रमित आहेत तर, आतापर्यंत 63174 जणांचा मृत्यू झाला आहे. (गेल्या 24 तासात जगभरात किती कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण वाढले पाहा)

कोरोना व्हायरस रुग्णसंख्येत अव्वल असलेल्या देशांची आकडेवारी

 1. अमेरिका- 2,838,678
 2. ब्राजील- 15,390,881
 3. रशिया- 673,564
 4. भारत- 648,315
 5. पेरू- 299,080
 6. चिली- 291,847
 7. इंग्लंड- 286,412
 8. मॅक्सिको- 252,165
 9. स्पेन- 250,545
 10. इटली- 241,419
 11. ईरान- 237,878
 12. पाकिस्तान- 225,283
 13. सऊदी अरब- 205,929
 14. तुर्की- 204,610
 15. फ्रान्स- 204,222
 16. जर्मनी- 197,198
 17. दक्षिण अफ्रीका- 187,977
 18. बांग्लादेश- 159,679
 19. कोलंबिया- 109,793
 20. कनाडा- 107,185

जगभात कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 10 हजारांहून अधिक असलेल्यांमध्ये इंग्लंड (44,283), इटली (34,854), मॅक्सिको (30,366), फ्रांस (29,896), स्पेन (28,385), भारत (18,655), ईरान (11,408), पेरू (10,412) आणि रशिया (10,011) या देशांचा समावेश आहे.