File image of US President Donald Trump | (Photo Credits: Getty)

चीन(China) मधील वुहान शहारातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसने विकसित झालेल्या देशांना सुद्धा झोडपून काढल्याने तेथे कोरोनाबाधितांचा आणि बळींचा आकडा वेगाने वाढत आहे. तर अमेरिका (US) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) त्यांच्या देशात कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे संतप्त झाले असून चीन मुळे हे संकट आले असल्याचे वारंवार म्हणत आहेत. तसेच चीननेच हा व्हायरस तयार केल्याचा दावा सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी चीनला डोनाल्ड ट्रम्प यांनी धारेवर धरले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला असून चीन राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग (Xi Jinping) यांच्यासोबत बोलण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच चीन सोबत असलेले सर्व संबंध तोडून टाकण्याची अप्रत्यक्ष धमकी सुद्धा जिनपिंग यांना ट्रम्प यांनी दिली आहे.

फोक्स अमेरिकन वृत्त यांच्याशी बोलताना ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, क्षी जिनपिंग यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. परंतु सध्या मला त्यांचासोबत बोलण्याची कोणतीही इच्छा नाही आहे. अमेरिकेत 84 हजार पेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरस नैसर्गिक नसून तो चीनच्या लॅब मध्ये तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे.(Coronavirus: कोणत्या देशात कोरोना व्हायरस संक्रमित किती रुग्ण? जगभरात 43 लाख नागरिकांना COVID-19 संक्रमण; 3 लाखांहून अधिक मृत्यू)

 दरम्यान, अमेरिकेत गेल्या 24 तासात 1754 जणांचा बळी गेल्याची माहिती AFP न्यूज यांनी दिली आहे. तर अमेरिकेतील एक्सपर्ट डॉ. अँथोनी फॉकी यांनी असे म्हटले होते की, अमेरिकेत लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेताना घाई करु नये. अन्यथा देशाचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. एका पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी शाळा सुरु करण्यासाठी तयारी करण्याचे आदेश दिले होते. परंतु फॉकी यांनी शाळा अद्याप सुरु करु नयेत असे स्पष्ट केले.