Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेत (US) कोरोना व्हायरसचा (Coronavirus)  प्रादुर्भाव अधिक वेगाने वाढत चालला आहे. संपूर्ण जगभरातील एक तृतीयांश ऐवढे कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आहेत. येथे कोरोना व्हायरस सारखा महारोग अधिक भयानक रुप घेताना दिसून येत आहे. सोमवारी अमेरिकेत नवे 19,037 रुग्ण आढळून आले असून 586 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाखांच्या पार गेला आहे.(Coronavirus Updates: जगभरातील COVID19 च्या संक्रमितांचा आकडा 68 लाखांच्या पार तर 4 लाखांहून अधिक जणांचा बळी)

वर्ल्डोमीटर यांच्या मते, अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या आकड्यात वाढ झाली आहे. मंगळवारच्या सकाळ पर्यंतची कोरोनाची आकडेवारी पाहिली असता 20 लाख 26 हजारांच्या पार गेली आहे. त्याचसोबत 1 लाख 13 हजार 055 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 7 लाख 73 हजार लोकांची प्रकृती सुधारली आहे. एकूण 6 टक्के कोरोनाच्या संक्रमितांचा मृत्यू झाला असून 33 टक्के लोकांची प्रकृती ठिक झाली आहे. अमेरिकतील न्यूयॉर्क शहरात सर्वाधिक 399,892 कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. फक्त न्यूयॉर्कमध्ये 30,516 लोकांचा बळी गेला आहे. त्यानंतर न्यू जर्सी येथे 166,917 कोरोनाच्या रुग्णांपैकी 12,292 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इलिनॉयस, फ्लोरिडा येथे सुद्धा कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. (Good News! Avifavir औषध COVID-19 विरूद्धच्या लढाईत 'Game Changer' ठरणार रशियाचा दावा; पुढील आठवड्यापासून रूग्णांवर वापरण्यासाठी सज्ज)

चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने आपले जगभरात जाळे पसरवले आहे. तर अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून कोरोना व्हायरसची उत्पत्ती करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार केला आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी आता असा दावा केला आहे की, त्यांच्या देशाने कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी एक व्हॅक्सिन बनवण्यात यश प्राप्त केले आहे. अमेरिकेने या व्हॅक्सिनचे 20 लाखांहून अधिक डोज तयार केल्याचे म्हटले आहे. परंतु याच्या सुरक्षितेबाबत तपासणी यशस्वी आल्यानंतर त्याचा उपयोग सुरु करण्यात येणार आहे. अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यस्था असून आम्हीला या महासंकटावर नियंत्रण मिळवण्यास सफल झाल्याचे ही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.