कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) महारोगाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे दररोज नव्या कोरोनाबाधित रुग्णांसह बळींच्या आकड्यात सुद्धा वाढत आहे. तर आता जगभरातील कोविड19 च्या संक्रमितांचा आकडा 68 लाखांच्या पार झाला असून 4 लाखांपेक्षा अधिक जणांनी जीव गमावला आहे. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंग यांनी कोरोनाची नवी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यांनी आकडेवारी जाहीर करत असे म्हटले आहे की, जगभरात रविवारच्या सकाळपर्यंत एकूण 68 लाख 55 हजार 858 लोकांना कोविड19 ची लागण झाली आहे. त्यामध्ये 3 लाख 98 हजार 321 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सीएसएसई यांनी असे म्हटले आहे की, जगभरात कोरोना व्हायरसमुळे संक्रमितांचा आणि बळींची सर्वाधिक संख्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत एकूण 1 लाख 9 हजार 791 जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून 19 लाख 19 हजार 430 जणांना त्याची लागण झाली आहे. त्यानंतर ब्राझील येथे सुद्धा कोरोना संक्रमितांचा आकडा अधिक आहे. ब्राझील मध्ये 6 लाख 45 हजार 771 कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. तसेच रुस येथे 4 लाख 58 हजार 102 प्रकरणे समोर येत तो तिसऱ्या स्थानकावर आहे.(Coronavirus: उघडलेली शाळा बंद करावी लागली, सरकारला निर्णय महागात पडला; 301 जणांना कोरोन व्हायरस लागण, 250 हून अधिक मुले संक्रमित)
तर 2 लाख 86 हजार 294 प्रकरणे ब्रिटेन, 2 लाख 46 हजार 611 प्रकरणे भारत, 2 लाख 41 हजार 310 प्रकरणे स्पेन, 2 लाख 34 हजार 450 प्रकरणे जर्मनी, 1 लाख 69 हजार 156 प्रकरणे ईराण, 1 लाख 69 हजार 218 प्रकरणे तुर्की, 1 लाख 27 हजार 745 प्रकरणे चिली आणि 1 लाख 10 हजार 26 प्रकरणे मेक्सिको येथे कोरोनाचे सर्वााधिक रुग्ण आढळून आले आहेत.(Good News! Avifavir औषध COVID-19 विरूद्धच्या लढाईत 'Game Changer' ठरणार रशियाचा दावा; पुढील आठवड्यापासून रूग्णांवर वापरण्यासाठी सज्ज)
सीएसएसई यांच्या आकडेवारीनुसार, जगातील मृतांचा आकड्याबाबत बोलायचे झाल्यास तर अमेरिके नंतर एकूण 40 हजार 548 बळींसह ब्रिटेन दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर युरोपीय देशात सुद्धा हा आकडा अधिक आहे. महारोगामुळे 10 हजारहून अधिक मृतांचा आकडा असणाऱ्या अन्य देशात 35 हजार 26 आकडा हा ब्राझील, 33 हजार 846 जणांचा बळी इटली. 29 हजार 145 मृत्यू फ्रान्स, 27 हजार 135 मृतांचा आकडा स्पेन आणि 13 हजार 170 जणांचा बळी मेक्सिको येथे गेले आहेत.