Coronavirus: उघडलेली शाळा बंद करावी लागली, सरकारला निर्णय महागात पडला; 301 जणांना कोरोन व्हायरस लागण, 250 हून अधिक मुले संक्रमित
Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: Getty Images)

इस्रायल (Israel) हा जगातील अशा काही देशांपैकी एक आहे, जिथे कोरोना व्हायरस (Coronavirus) मोठ्या प्रमाणात नियंत्रित आहे. आणि हेच कारण होते की मेच्या शेवटच्या आठवड्यात इस्रायली सरकारने शाळा उघडल्या. मात्र हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला आहे. शाळा उघडल्यानंतर, देशातील 261 मुले आणि शालेय कर्मचारी कोरोना विषाणू संक्रमित झाले आहेत. टाईम्स ऑफ इस्रायलने याबाबत वृत्त दिले आहे. यानंतर इस्त्रायली सरकारने आपला निर्णय मागे घेत शाळा पुन्हा बंद केल्या. मार्चमध्ये इस्राईलमध्ये कोविड-19 वेगाने वाढत होता. एप्रिलमध्ये प्रकरणे आणखी वाढले. या काळात इस्रायलने चाचण्या ते लॉक डाऊन पर्यंत कठोर निर्णय घेतले.

30 एप्रिल रोजी इस्रायलमध्ये 15,946 प्रकरणे नोंदवली गेली. पुढील 15 दिवसांत या देशात कोरोनाची केवळ 600 प्रकरणे समोर आली. यामुळे सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता एनपीआरच्या वृत्तानुसार, इस्त्रायली शाळांमधील 301 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार संसर्ग झालेल्या 261 मुलांमध्ये 250 मुले आहेत. यासह, देशात एकूण संसर्ग 17,377 वर पोहोचला आहे. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 3000 विद्यार्थी आणि शिक्षक बुधवारी आयसोलेशनमध्ये गेले. ही संख्या 4,925 वरून 7,898 वर गेली आहे. (हेही वाचा: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व पत्नी महजबीनला कोरोना व्हायरसची लागण; उपचारासाठी कराचीच्या मिलिटरी इस्पितळात दाखल)

इस्रायलमध्ये या अचानक समोर आलेल्या नवीन प्रकरणानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शाळा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान म्हणाले की, कोणत्याही शाळेत एकसुद्धा कर्मचारी अथवा विद्यार्थी कोरोना विषाणू बाधित आढळला, तरी शाळा उघडणार नाहीत. आता शाळांमध्ये नवीन प्रकरणांनंतर 13,696 लोक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या देशात 87 शाळा बंद आहेत. दरम्यान सध्या देशात कोरोना व्हायरसची 17,562 प्रकरणे असून, 291 जणांचा मृत्यू झाला आहे व 15,026 लोक यातून बरे झाले आहेत.