coronavirus impacts (Photo Credits: Pixabay)

जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या आता 48 लाख इतकी झाली आहे. तर आतापर्यंत जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित 3,23,000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. जॉन्स हॉपकिन्स संचलीत सेंटर फॉर सिस्टम साइंस एंड इंजीनियरिंग (CSSE) ही आकडेवारी जाहीर करत असते. सीएसएसईने बुधवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 4,897,492 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 3,23,285 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्यास्थितीत जगभरातील देशांमध्ये सर्वाधिक कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण असलेल्या देशात अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1,528,568 नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमन झाले आहे. इथे मृत्यू झालेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 91,921 इतकी आहे. (हेही वाचा, Moderna Coronavirus Vaccine: अमेरिकेमध्ये मानवी चाचणीचे सुरूवातीच्या टप्प्यातील निष्कर्ष दिलासादायक असल्याचा कंपनीचा दावा)

विविध देशातील कोरोना रुग्णांची संख्या (अनुक्रमे)

अमेरिका- 1,528,568

रशिया- 299,941

ब्राझिल- 271,885

इग्लंड- 250,138,

स्पेन- 231,606

इटली- 232,037

फ्रान्स- 180,933

जर्मनी- 177,778

तुर्की- 151,615

इरान- 124,603

दरम्यना, कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची इंग्लंडमधील संख्या 35,422 इतकी आहे. कोरोना व्हायरस संक्रमणामुळे 10 हजारपेक्षा अधिक नागरिक मृत्यू झालेल्या देशांबाबत बोलायचे तर इटली- 32,169, फ्रान्स- 28,025, स्पेन- 27,778आणि ब्राझील -16,983 अशी आकडेवारी आहे.