Pfizer च्या तुलनेत  AstraZeneca  लसीमुळे अधिक मृत्यू, Sputnik V ने केला खळबळजनक दावा
Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

रशियाची कोरोनावरील लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, फायजर (Pfizer) च्या तुलनेत एस्ट्राजेनेकाची (AstraZeneca)  लस घेतल्यानंतर अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आणि आपत्कालीन वापराकरिता स्पुतनिक व्ही सुद्धा वापरली जाणारी तिसरी लस आहे. 13 आंतरराष्ट्रीय स्वास्थ नियमाकांकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांचा हवाला देत त्यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. (Coronavirus Pandemic: भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवर पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांचे ट्वीट)

शुक्रवारी त्यांनी एका ट्विट मध्ये म्हटले की, एका अभ्यासातून समोर आले की प्रति 19 लाख लसींच्या हिशोबाने एस्ट्राजेनेकाच्या लसीच्या तुलनेत फायजर लस घेतल्याने अधिक मृत्यू झाले आहेत. त्यांनी विभिन्न लसीच्या दरम्यान मृतांच्या आकडेवारी संबंधित जाणवलेल्या फरकाचा मुद्दा उचलून धरला. त्याचसोबत ईमानदारीने सर्व वैज्ञानिक आणि सार्वजनिक चर्चेतून लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, फायजर आणि एस्ट्राजेनेका यांनी स्पुतनिक व्ही यांच्या अभ्यासावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जानेवारी मध्ये फायजर बायोएनटेक एमआरएनए लसीच्या लसीकरणानंतर नॉर्वेत कथित रुपात 23 वृद्धांचा मृत्यू झाला होता.(Sputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत)

दुसऱ्या बाजूला देशांनी लसीकरण केल्यानंतर ब्लड क्लॉट्सच्या तक्रारी नंतर ते थांबवले गेले. याच दरम्यान औषध बनवणारी प्रमुख कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी असे म्हटले की, त्यांना ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया मधून स्पुतनिक व्ही लस ही भारतात आयात करण्याची परवानगी मिळाली आहे. तर भारतात देशव्यापी लसीकरण मोहिम 16 जानेवारी पासून सुरु झाले आहे. आता तिसऱ्या लसीसाठी परवानगी मिळाल्यानंतर लसीकरणाला अधिक वेळ आल्याची शक्यता व्यक्त केली आहे.