कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगभरात चीन (China), इटली (Italy) पाठोपाठ आता महासत्ता अमेरिकेला (US) सर्वाधिक फटका बसल्याचे सिद्ध होत आहे. अमेरिकेत मागील 24 तासात कोरोनाच्या जीवघेण्या विषाणुने तब्बल 2 हजार 200 जणांचा बळी घेतला आहे. याबाबत AFP या वृत्त संस्थेने माहिती दिली आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसचे 10 लाख रुग्ण आहेत. आतापर्यंतची एकूण आकडेवारी पाहिल्यास कोरोनामुळे 58 हजार 355 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1 लाख 15 हजार 936 रुग्णांनी या कोरोनावर मात केली आहे. अजूनही बहुतांश रुग्ण हे कोरोनाशी लढत आहेत आणि दुर्दैवाने यातील अनेकांची प्रकृती ही गंभीर असल्याचे समजतेय. कोणत्या देशांत Coronavirus नाही? जाणून घ्या असे देश जिथे अजूनही कोरोना विषाणूचा एकही रुग्ण नाही
अमेरिकेत सुद्धा न्यू यॉर्क शहराला कोरोनाने आपल्या विळख्यात अडकवले आहे. या एकट्या शहरात कोरोनाचे 17 हजार 682 बळी गेले आहेत. जवळपास 2 कोटी इतकी या शहराची लोकसंख्या असल्याने त्यात ही स्थिती सांभाळणे हे मोठे टास्क होऊन गेले आहे. परिस्थिती इतकी भीषण झालीये की शहरातील काही हॉस्पिटलच्या शवघरात मृत रुग्णांचे शव ठेवण्याची सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही असे म्हंटले जात आहे.
ANI ट्विट
More than 2,200 #coronavirus deaths in 24 hours in the United States of America (USA): AFP news agency
— ANI (@ANI) April 29, 2020
जगभरातील कोरोना बाधितांची संख्या ही आज घडीला, 31 लाख 16 हजार 390 इतकी मोठी आहे तर आतापर्यंत जगभरात 2 लाख 17 हजार 153 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या जागतिक महामारीशी जगातील 200 देश लढत आहेत. भारतात सुद्धा परिस्थिती हळूहळू गंभीर होत आहे, भारतात सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही 31 हजार 332 वर पोहचली आहे.