![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/03/Coronavirus-8-380x214.jpg)
देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेची (Coronavirus Second Wave) तीव्रता कमी होत आहे. मात्र कोविड-19 (Covid-19) चे संकट अद्याप पूर्णत: टळलेले नाही. कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटने (Delta Variant) जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही (World Health Organization) याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. WHO चे प्रमुख वैज्ञानिक यांनी शुक्रवारी सांगितले की, कोविड-19 चे डेल्टा वेरिएंट सर्वप्रथम भारतात आढळून आला. त्यानंतर तो आतापर्यंत एकूण 80 देशात पसरला असून तिथेही त्याच्या संसर्गाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता हे चिंतेचे कारण झाले आहे. परिणामी अन्य देशातही कोविड-19 च्या या वेरिएंटपासून सुरक्षित राहण्यासाठी निर्बंध लादले जात आहेत.
अमेरिकेने देखील अतिशय संसर्गजन्य डेल्टा वेरिएंट बद्दल चिंता व्यक्त केली आहे. डेल्ट वेरिएंटचा प्रसार अधिक वेगाने होतो. अधिक संसर्गजन्य असलेल्या या वेरिएंटमुळे व्यक्ती गंभीररीत्या आजारी होऊ शकतो, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. (Covid-19 Delta Plus Variant: काय आहे कोविड-19 चे नवे डेल्टा प्लस वेरिएंट? जाणून घ्या सविस्तर)
ब्रिटेनमध्ये डेल्टा वेरिएंटचा धुमाकूळ:
ब्रिटेनमध्ये डेल्टा वेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. मागील आठवड्यात ब्रिटेनमध्ये डेल्टा वेरिएंटमुळे 33,630 नव्या रुग्णांना संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत यामुळे एकूण 75,953 रुग्ण बाधित झाले आहेत. दरम्यान, पब्लिक हेल्थ इंग्लंडने सांगितले की, अल्फा वेरिएंटच्या तुलनेत डेल्टा वेरिएंटमुळे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा धोका अधिक आहे.
डेल्टा वेरिएंट इतर वेरिएंट्सच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहे. अल्फा वेरिएंटच्या तुलनेत याचा फैलाव 50 टक्के अधिक वेगाने होतो, असा अंदाज आहे, असे तज्ञांच्या अभ्यासातून समोर आले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या नव्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे ब्रिटेमध्ये लॉकडाऊन चार आठवड्यांसाठी म्हणजेच 19 जुलै पर्यंत वाढवण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेतही वाढता धोका:
दक्षिक आफ्रिकेच्या काही भागातही कोरोना व्हायरसची तिसरी लाट यायला सुरुवात झाली आहे. संसर्ग झपाट्याने होत आहे. याचा थेट परिणाम आर्थिक केंद्र गाऊतेंग प्रांतावर होत आहे. तसंच मृतांचा आकडाही वाढत असून 48 टक्के झाला आहे.
रशियात देखील वाढती रुग्णसंख्या:
रशियात कोविड-19 चा संसर्गाचा वेग 50 टक्के वाढला आहे. रशियाच्या सर्वाधिक प्रभावित क्षेत्र मॉस्को मध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा दुप्पटीने वाढत आहे. रशियाच्या राजधानीत रुग्णांची संख्या तीपट्टीने वाढत आहे.