Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

अमेरिका, ब्रिटन आणि जगभरातील इतर देशांप्रमाणे फ्रान्समध्येही कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रविवारी (17 मे 2020) पुढे आलेल्या आकडेवारीनुसार फ्रान्समध्ये 483 नव्या मृतांसह एकूण मृतांचा आकडा हा तब्बल 28000 हजारांवर पोहोचला. फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, केविड 19 संक्रमणामुळे देशातील मृतांचा आकडा 28 हजा 108 इतका झाला आहे.

वृत्तसंस्था सिन्हुआचा हवाला देत आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, फ्रान्समध्ये कोरोना संक्रमनाचा वेग मंदावत आहे. शनिवारी नोंद झालेल्या आकडेवारीनुसार, कोरना संक्रमितांचा आकडा हा 19 हजार 432 इतका होता. रविवारी हाच आकडा 19 हजार 361 इतका राहिला. फ्रान्समध्ये सातव्या आठवड्यात कोरोना संक्रमनाची संख्या घटताना दिसत आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपाचर घेत असलेल्या रुग्णांमध्येही 45% घट झाली आहे. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही 2 हजार 87 इतकी आहे. (हेही वाचा, Coronavirus: अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसमुळे 1237 जणांचा मृत्यू- AFP)

फ्रान्समध्ये कोरोना व्हायरस संकट आल्यापासून इथे आतापर्यंत 14 लाख 2 हजार 411 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 61 हजार 213 इतकी आहे. फ्रान्समध्येही कोरोना व्हायरस संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दोन महिन्यांनंतर हा लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात येत आहे.