चीन (China) मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने आपले जाळे संपूर्ण जगभरात पसरवले आहे. यामुळे सर्व देशांना कोरोना व्हायरसमुळे मोठा फटका बसला असून त्याच्या रुग्णांसह बळींचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. चीन नंतर आता सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा इटली, अमेरिका (US) सारख्या बड्या देशात वाढत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासात 1237 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. याबाबत AFP न्यूज यांनी अधिक माहिती दिली आहे. अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनवर भडकले असून त्यांनीच हा व्हायरसची निर्मिती केली आहे असा वारंवार आरोप करत आहेत.
अमेरिकेत कोरोनाची सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तरीही डोनाल्ड ट्रम्प लॉकडाउन उठवण्याचा विचार करत आहेत. यापूर्वी सुद्धा काही नागरिकांनी लॉकडाउन लागू केल्यानंतर त्याबाबत आंदोलन केल्याचे दिसून आले होते. डोनाल्ड ट्रम्प आता शाळा सुरु करण्याची तयारी करत असून तसे त्यांनी निर्देशन शाळांना दिले आहेत. परंतु कोरोनाची अमेरिकेतील परिस्थिती पाहता शाळा सुरु करण्याचा निर्णय घेऊ नये असे ही काही जणांकडून बोलले जात आहे. अमेरिकेने या वर्षाच्या अखेर पर्यंत कोरोनावर लस घेऊन येऊ असा दावा केला आहे.(दिलासादायक: ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना विषाणूच्या लसीचे माकडांवर दिसले सकारात्मक परिणाम; आता मानवांवर होणार चाचणी)
United States adds 1,237 #coronavirus deaths in 24 hours: Johns Hopkins (AFP news agency)
— ANI (@ANI) May 17, 2020
जगातील अन्य देशांतील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास रुस येथे सुद्धा कोविड19 ने थैमान घातले आहे. शुक्रवारी रुसमध्ये 9200 नवी प्रकरणे समोर आली होती. रुस येथे 2,72,042 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तसेच 2537 जणांचा बळी गेला आहे. त्याचसोबत इटली येथे 31,763 जणांचा मृत्यू झाला असून 2,24,760 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.