Coronavirus | Image Used For Representational Purpose | File Image

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीनमध्ये (China) जन्मलेल्या कोरोना व्हायरसने इटलीसह (Italy) इराणमध्येही (Iran) थैमान सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यातच इराण येथील मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात आणखी 127 लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. करोनामुळे इराणमध्ये आतापर्यंत 1 हजार 812 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 23 हजार 049 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या 170 हून अधिक देश कोरोना व्हायरसशी झुंज देत आहे.

कोरोना व्हायरसमुने हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये मृतांच्या गतीत घट झाली असून सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे समजत आहे. तसेच गुरुवारपर्यंत देशात एकही रुग्ण सापडला नसल्याचे चीनने घोषणा केले होते. मात्र, चीननंतर आता इटली आणि इराणमध्ये कोरोनाव्हायरसने थैमान घातले आहे. या दोन्हा देशात मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हे देखील वाचा- ब्रिटनची राणी एलिझाबेथ 2 यांच्या बकिंघम पॅलेसमध्ये आढळला COVID-19 रुग्ण

इराण-

करोना व्हायरसमुळे इटलीप्रमाणे इराणमध्येही भीषण परिस्थिती आहे. इराणमध्येही मृतांचा आकडा दररोज वाढत आहे. करोना व्हायरसमुळे इराणमध्ये आणखी 127 जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे इराणमध्ये आतापर्यंत 1812 जणांचा मृत्यू झाला आहे. वेगाने सर्वत्र फैलावात चाललेल्या करोना व्हायरसला रोखणे आज इराणसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. इराणमध्ये गेल्या 24 तासात 127 जणांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. इराणमध्ये आतापर्यंत 23 हजार 049 जणांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. तसेच इराणमध्ये गेल्या 24 तासात करोना व्हायरसची लागण झालेले 1 हजार 411 नवीन रुग्ण सापडले आहेत.

इटली-

चीननंतर कोरोनाव्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू इटलीत झाले आहेत. ज्या लोकांमध्ये कोरोना व्हायरस लक्षणे आहेत, त्यांच्यात प्रतिकार शक्ती कमी असल्याचे समोर आले आहे. इटलीत वृद्धांची संख्या अधिक आहे. महत्वाचे म्हणजे, उच्च रक्तदाब, मधुमेह रुग्णांसाठी कोरोना व्हायरस अधिक धोकादायक आहे, असे एका अभ्यासातून दिसून आले आहे. इटलीतील नागरिकांनी सुरुवातीला कोरोना व्हायरसच्या तपासणीकडे दुर्लक्ष केल्याची कळत आहे. कोरोनाव्हायरस पसरल्यानंतर इतर देशांप्रमाणे इटलीने खबरदारीही घेतली नव्हती. ज्यामुळे हा आजार झपाट्याने पसरला. सार्वजनिक आरोग्य प्रणालीही सक्षम नसल्याचे बोलले जाते. त्यात डॉक्टरांनाही या आजाराची लागण होत असल्याच्या बातम्या येत आहेत.

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. यापैंकी 1 लाख 38 हजार रुग्ण बरे झाल्याचे समजत आहे.