Coronavirus: कोरोना व्हायरस वाढतोय! भारतात जाणं टाळा; अमेरिकेच्या CDC विभागाचा नागरिकांना सल्ला
Coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतातील वाढती कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या पाहता जगभरातील प्रगत देश सावध भूमिका घेताना दिसत आहेत. देशांतर्गत लसीकरण (Corona Vaccination) झाले असले तरी नजीकच्या काळात भारतात प्रवेश करणे अथवा प्रवास करणे टाळा असा सल्ला अमेरिकेने (USA) आपल्या नागरिकांना दिला आहे. अमेरिकेतील बहुतांश नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तरीही युनायटेड स्टेट्सची मेडिकल नियामक संस्था सेंटर फॉर डिजीज कंट्रेल (CDC ) द्वारा अमेरिकन नागरिकांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. CDC ने म्हटल आहे की, जरी कोरोना विरुद्धची लस घेतली असली तरीही भारतात प्रवास केलेल्या प्रवाशांना COVID 19 संसर्गाचा धोका होऊ शकतो. कोरोनाच्या अनेक व्हेरीएन्ट्सपैकी एखादा व्हेरीएन्स्ट लस घेतलेल्या नागरिकांनाही धोकादायक ठरु शकतो.

भारतात मार्च महिन्यात कोरोना व्हायरस संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना व्हायरस संसर्गाने देशाला अत्यंत वाईट पद्धतीने विळख्यात घेतले आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. देशात युके, ब्राझील, दक्षिण अफ्रिका आदी देशांतील व्हेरिएट्सचा प्रसार झाला आहे. मध्यंतरीच एक रिपोर्ट आला होता. यात म्हटले होते की, देशात दोन व्हेरिएट्सचा डबल म्यूटेशन झाले होते. हे डबल म्युटेशन भारताती अनेक शहरांंमध्ये पसरले आहे. (हेही वाचा, Boris Johnson Cancels Visit to India Due to Covid-19: बोरिस जॉनसन यांचा भारत दौरा रद्द; वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर घेतला महत्त्वपूर्ण निर्णय)

दरम्यान, इंग्लंडने सोमवारी भारताला ट्रॅव्हल रेड लिस्टमध्ये टाकले आहे. इंग्लंडचे आरोग्य मंत्री मॅट हेनकॉक यांनी म्हटले आहे की, इंग्लंडने काही देशांचा समावेश करत रेड लिस्ट जारी केली आहे. यात भारताचाही समावेश आहे. इंग्लंड आणि आयरीश लोकांशिवाय भारतातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तिस प्रतिबंध करण्यात येत आहे या लोकांना परत पाठवेपर्यंत सरकारकडून मंजूर हॉटेलमध्ये 10 दिवस क्वारंटाईन राहावे लागेल. दरम्यान, काही तासांपूर्वीच इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी पुढच्या आढवल्यात नियोजीत असलेला भारत दौरा रद्द केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.