Boris Johnson Cancels Visit to India Due to Covid-19: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) पुढील आठवड्यात भारत दौर्यावर येणार नाहीत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोरिस जॉनसन यांनी भारत दौरा रद्द केला आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून दोन्ही देशांनी संयुक्तपणे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात MEA ने माहिती दिली आहे. MEA च्या वतीने सांगण्या
त आले आहे की, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता पुढच्या आठवड्यात ब्रिटनचे पंतप्रधान भारतात येणार नाहीत, असा परस्पर करारानुसार निर्णय घेण्यात आला आहे. भारत-ब्रिटेन संबंधांसाठीच्या योजना सुरू करण्यासाठी येत्या काही दिवसात Virtual Meeting चे आयोजन केले जाईल.
ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन 25 एप्रिल रोजी भारत दौर्यावर येणार होते. परंतु, सध्या भारतात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला असून भयानक परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी ही भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जॉन्सन यांची भारत दौरा यापूर्वी जानेवारीत प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवावेळीदेखील पुढे ढकलण्यात आला होता. (वाचा - Coronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा)
दरम्यान, भारतात गेल्या 24 तासात भारतात 2,73,810 नव्या कोरोना प्रकरणांची नोंद करण्यात आली. देशात संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1.50 दशलक्षाहून अधिक आहे. गेल्या 15 दिवसांत सुमारे 25 लाख नवीन प्रकरणे समोर आली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या सध्या 19 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.
In view of the #COVID19 situation, it has been decided by mutual agreement that the Prime Minister of the United Kingdom will not visit India next week. The two sides will be holding a virtual meeting in the coming days to launch plans for a transformed India-UK relationship: MEA pic.twitter.com/RVpQD9JIwf
— ANI (@ANI) April 19, 2021
भारतात 19 डिसेंबर रोजी कोरोना विषाणूची एकूण प्रकरणे एक कोटीच्या वर गेली. 107 दिवसांनंतर म्हणजेचं 5 एप्रिलला ही प्रकरणे 125 दशलक्षांपेक्षा जास्त झाली. संसर्गाची प्रकरणे 15 दशलक्षाहून अधिक होण्यास अवघ्या 15 दिवसांचा कालावधी लागला. सलग 40 व्या दिवशी संक्रमणाची प्रकरणे वाढली आहेत.